How to Make Agarbatti : आता घरीच बनवा अशी नॅचरल अगरबत्‍ती

तुम्ही घरी सुद्धा नैसर्गिकरित्या अगरबत्ती तयार करू शकता. चला तर जाणून घेऊया.
How to Make Agarbatti
How to Make Agarbattisakal
Updated on

How to Make Agarbatti : पुजा किंवा धार्मिक कार्यक्रमात अगरबत्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अगरबत्तीशिवाय अनेक पुजा कार्य अपुर्ण आहे. देवासमोर एक अगरबत्ती लावल्यानेही मन तृप्त होतं. अगरबत्ती केवळ मंदिरात किंवा घरात सुंगधच पसरवत नाही तर यात अँटीसेप्टिक आणि किटकनाशकी गुणही आढळतात.

अनेकदा आपण दुकानातून अगरबत्ती विकत आणतो पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही घरी सुद्धा नैसर्गिकरित्या अगरबत्ती तयार करू शकता. चला तर जाणून घेऊया. (How to Make Agarbatti at home incense stick made at home)

How to Make Agarbatti
Home Decoration Ideas : जुन्या वस्तू भंगारात घालू नका? त्यापासून बनवा काहीतरी भन्नाट!

साहित्य

  • 3 किलो- चारकोल पावडर

  • 1 किलो- जिगत पावडर

  • 1 किलो- सो डस्‍ट

  • दिड किलो- बांबू स्टिक्‍स

  • लिक्विड परफ्यूम

  • पानी

How to Make Agarbatti
Dosa Sticking to Iron Tava : लोखंडी तव्याला तुमचाही डोसा चिकटतो? 'या' ट्रिक्स ट्राय करा

कृती

अगरबत्‍ती बनवण्यासाठी चारकोल पावडर, जिगत पावडर आणि सो डस्‍टला मिक्‍स करुन त्याचा प्रिमिक्‍स बनवावा. तुम्ही बाजारातूनही अगरबत्तीचा प्रिमिक्स पावडर बनवू शकता.

या प्रिमिक्समध्ये पानी मिक्स करा. आता बांबू स्टिक घ्या आणि या मिश्रणाला स्टिक्‍सवर रोल करायला सुरवात करा.

स्टिकवर मिश्रणला थीन लेअरनी रोल करा. त्यानंतर याला हवेत वाळवायला घाला.

आता तयार अगरबत्‍तीमध्ये परफ्यूम टाका. एक किलोच्या परफ्यूम मध्ये 4 किलो डीईपी मिक्स करा. डीईपी एक पॅराफिन हायड्रोकार्बन ऑइल आहे, ज्याच्या मदतीने सुगंध दिर्घकाळ टिकतो.

आता अगरबत्तीचा एक बंडल बनवा. बंडलला या मिश्रणामध्ये डिप करा. त्यानंतर वाळवायला ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com