
पाच मिनटात बनवा मँगो मिल्कशेक, जाणून घ्या रेसिपी
सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरु आहे.यामुळे या कडक उन्हात बहुतेकांना फळे आणि ज्यूस घेणे आवडते. फळांमध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात. यात उन्हाळ्यात फळांचा राजा असलेला आंबा खायला सर्वांनाच आवडतं.अशात मँगो मिल्कशेक सर्वांच्याच आवडीचाच विषय.लहान मुलांना मँगो मिल्कशेक खूप आवडतो. तुम्हाला मँगो मिल्कशेक घरीच बनवायचा असेल तर खालील रेसिपी जाणून घ्या.
हेही वाचा: छोट्या शेफची भन्नाट पाककृती होतीय व्हायरल
मँगो मिल्कशेक बनवण्यासाठी साहित्य
दोन मोठे आंबे
चार स्कूप व्हॅनिला आइस्क्रीम
काजूचे चार तुकडे
एक कप दूध
दोन टेबलस्पून साखर
बदामचे चार तुकडे
हेही वाचा: घामाच्या दुर्गंधीपासून सुटका पाहिजे? या सात टिप्स फॉलो करा
मँगो मिल्कशेक कसा बनवायचा
१. सर्वप्रथम आंब्याचा लगदा काढा.
प्रथम आंबा सोलून त्याचा लगद्याचे लहान तुकडे करा. उरलेला लगदा एका भांड्यात काढा.
2 सर्वकाही एकत्र मिसळा
आंब्याचा लगदा ब्लेंडरमध्ये टाका.त्यासोबत थंडगार दूध, साखर आणि व्हॅनिला आइस्क्रीमचे 2 स्कूप सोबत टाका. गुळगुळीत मिश्रण तयार करण्यासाठी एकत्र मिसळा.
3. ग्लासमध्ये घाला
आता मिल्कशेक दोन वेगळ्या ग्लासमध्ये घाला आणि 3/4 ने वा़टून घ्या. प्रत्येक ग्लासमध्ये व्हॅनिला आइस्क्रीमचा एक स्कूप घाला.
4. सजवून सर्व्ह करा
कापलेले काजू, बदाम घालून सजवून सर्व्ह करा
Web Title: How To Make Fresh And Tasty Mango Milkshake At Home Check Recipe
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..