Homemade Lipstick : ना खर्चाची चिंता, ना केमिकलची भीती... 'या' सोप्या पद्धतींनी घरीच बनवा लिपस्टिक

'या' सोप्या पद्धतींनी घरीच बनवा लिपस्टिक, ओठांना बनवा सुंदर
Lipstick
Lipstick sakal

जेव्हाही आपण मेकअपच्या काही वस्तू खरेदी करायला जातो तेव्हा आपण लिपस्टिकच्या वेगवेगळ्या शेड्स नक्कीच ट्राय करतो. कारण लिपस्टिकशिवाय मेकअप पूर्ण दिसत नाही. परंतु अशा अनेक लिपस्टिक आहेत ज्या खूप महाग आहेत.

जर तुम्हाला लिपस्टिक लावायला आवडतं, मात्र त्यावर जास्त पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल; तर तुम्ही घरच्या घरीच लिपस्टिक बनवू शकता. विशेष म्हणजे, यामध्ये वापरल्या जाणाऱ्या गोष्टींमुळे हानीकारक केमिकल्सची भीतीही राहत नाही, जे कदाचित महागड्या ब्रँड्सच्या लिपस्टिकमध्ये असू शकतात.

लिपस्टिक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • लिपस्टिक कलर

  • ब्रश

  • व्हॅसलीन - 1 टीस्पून

  • सनस्क्रीन - 1/4 चमचे

  • कॉम्पॅक्ट पावडर - 1 टीस्पून

  • इसेंशियल ऑईल - 2-3 थेंब

Lipstick
Women Fashion : सलवार सूटच्या या डिझाईन्स सिंपल लूकसाठी आहेत बेस्ट, दिसाल आकर्षक

लिपस्टिक कशी बनवायची

यासाठी सर्वप्रथम एक वाटी घ्यावी लागेल.

आता त्यात व्हॅसलीन टाकावे लागेल.

नंतर त्यात सनस्क्रीन टाका आणि दोन्ही गोष्टी नीट मिसळा.

आता त्यात कॉम्पॅक्ट पावडर टाकायची आहे.

यानंतर, तुम्हाला ज्या रंगाची लिक्विड लिपस्टिक बनवायची आहे तो कलर मिक्स करा.

आता त्यात इसेंशियल ऑईल घाला आणि सर्वकाही चांगले मिसळा.

आता डबल बॉयलरच्या मदतीने ते वितळवा.

यानंतर एअर टाइट कंटेनरमध्ये ठेवा आणि सेट होऊ द्या.

त्यानंतर ब्रशच्या मदतीने ओठांवर लावा.

या गोष्टी लक्षात ठेवा

जर तुम्हाला सनस्क्रीन वापरायचे नसेल तर तुम्ही मॉइश्चरायझर वापरू शकता.

ते कधीही उघडे ठेवू नका.

ब्रशच्या मदतीने लिपस्टिक वापरा आणि बोटांनी लावू नका.

ही लिपस्टिक संपल्यानंतर, तुम्ही जास्त पैसे खर्च न करता ते घरी पुन्हा तयार करू शकता. यामध्ये व्हॅसलीन मिक्स असते जे ओठांना हायड्रेट ठेवण्यास मदत करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com