How to Manage Overthinking:: अतिविचार करण्यावर ठेवू शकतो नियंत्रण, पण कसं? 'या' गोष्टी करू शकतात मदत

How to Stop Overthinking: अतिविचारावर नियंत्रण हवे, पण त्यासाठी कोणत्या गोष्टी करता येऊ शकतात, हे जाणून घेऊ.
Overthinking
Overthinking Sakal
Updated on

How to Manage Overthinking: बऱ्याचदा आपण एखाद्या गोष्टीचा खुप विचार करतो. चौकस विचार करणं वेगळं आणि अतिविचार करणं वेगळं. बऱ्याचदा आपण नको त्या गोष्टींचा बराचवेळ विचार करत बसतो, खरंतर त्याची काहीच गरजही नसते.

सातत्याने डोक्यात कशाचा ना कशाचा विचार सुरूच राहतो, त्यामुळे अतिविचाराने मन आणि शरीरही थकतं. अशा अतिविचारामुळे अनेकदा आपण शारिरीकरित्या दमत नसलो, तरी आपल्याला मानसिक थकवा येतो. कारण अतिवाचार करण्यात आपली उर्जा खर्च केलेली असते.

त्याचमुळे अतिविचार करण्याला नियंत्रण असायला हवे, पण त्यासाठी कोणत्या गोष्टी करता येऊ शकतात, हे जाणून घेऊ.

1. दीर्घ श्वास घ्या

जेव्हा असं वाटेल की आपण अतिविचार करतोय, तेव्हा डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घेत राहा. तुमच्या श्वासोच्छ्वासाकडे लक्ष द्या. यामुळे मनात येणाऱ्या इतर विचाराकडे लक्ष जाणार नाही आणि तुम्हाला शांतही वाटेल. तसेच जमल्यास ध्यान करा.

2. लक्ष विचलित करा

ज्यावेळी खुप विचार मनात येत असतील, अशावेळी तुमचे लक्ष विचलित करा. तुमचे मन दुसऱ्या गोष्टीत किंवा काम करण्यात गुंतवा. त्यामुळे ज्या गोष्टीचा तुम्ही अतिविचार करताय, त्यातून तुमचे मन विचलित होईल.

3. वर्तमानावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा

अनेकदा आपण भूतकाळातील गोष्टींचा किंवा एखादी गोष्ट भविष्यात कशी असेल, याचा अधिक विचार करतो. यामुळे अतिविचार करतो. पण बऱ्याचदा अशा गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेरच्या असतात. त्यामुळे नियंत्रणाबाहेरील गोष्टींवर लक्ष देण्यापेक्षा, जे आपल्या हातात आहे, जे आपण नियंत्रित करू शकतो, त्यावर लक्ष द्या. तुमच्या वर्तमानावर लक्ष द्या.

Overthinking
Homemade Peanut Butter: अवघ्या 10 ते 15 मिनिटात घरच्या घरी तयार करा पीनट बटर, कसं ते घ्या जाणून

4. नकारात्मक गोष्टींपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नकारात्मक विचार ओळखा. नकारात्मक विचार म्हणजे ज्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होतो अशा गोष्टी. तुम्ही एखादी गोष्ट करू शकत नसाल, तर ते स्विकारणे ही नकारात्मक गोष्ट नाही. पण राग आल्यानंतर काहीतरी वाईट करणे ही नकारात्मक गोष्ट आहे.

त्यामुळे तुमचे नकारात्मक विचार कोणते, हे लक्षात घेऊन त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाचे म्हणजे नकारात्मक विचार येणे, चुकीचे आहे, हा समज टाळा. नकारात्मक गोष्टी मनात येऊ शकतात, हे स्विकारा. पण त्याचबरोबर त्या नकारात्मक गोष्टींपासून दूर राहण्याचाही प्रयत्न करा.

यामुळे नंतर तुमच्या चुकीच्या कृतीवर किंवा विचारावर अजून विचार करणे तुम्ही टाळू शकता.

5. महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा

उगीचच नको त्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, याकडे लक्ष द्या. महत्त्वाच्या गोष्टी करण्यावर भर त्या, हवं तर नोंदी करा. त्यामुळे अतिविचार करण्यापेक्षा कोणती बाबींवर अधिक लक्ष द्यायचं आहे, हे लक्षात येईल.

Overthinking
World Water Day 2024 : जागतिक जल दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्व आणि इतिहास

6. विचाराबरोबरच कृती करा

बऱ्याचदा एखाद्या गोष्टीबद्दल, परिस्थितीबद्दल, घटनेबद्दल आपण इतका विचार करतो की त्यामुळेच थकून जातो. त्यामुळे त्यावर कृती करण्याची ताकदच आपल्याकडे राहत नाही. त्यामुळे अतिविचार करत बसण्यापेक्षा त्यावर कृतीही करण्यावर भर द्या. त्यामुळे तुमच्या विचारांना एक मार्ग मिळेल आणि अतिविचारापेक्षा त्यावर कामही होईल.

7. भीतीचा सामना करा

बऱ्याचदा एखाद्या गोष्टीची भीती वाटत असल्याने आपण त्याचा अतिविचार करतो. त्यामुळे तुम्हाला जी भीती आहे ती स्विकारा. त्यामुळे त्याचा सामना करणे सोपे जाईल. हळुहळू तुमच्या भीतीवर मात करण्याचा प्रयत्न करा.

8. मदत मागा

मदत मागायला कचरू नका. अनेकदा खुप विचार करण्यापेक्षा एखाद्या समस्येवर मदत मागा. त्यामुळे तुम्हालाच ते फायदेशीर ठरेल.

(डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com