World Water Day 2024 : जागतिक जल दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्व आणि इतिहास

World Water Day 2024 : संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक जल दिन साजरा करण्यास सुरूवात केली.
World Water Day 2024
World Water Day 2024sakal
Updated on: 

World Water Day 2024 : पाणी हे सर्वांसाठी अत्यंत गरजेचे आहे. त्याच्याशिवाय सजीव प्राणी, झाडे यांचा विनाश होईल. त्यामुळेच 'जल है तो जीवन हे' असे मानले जाते. आपल्या जीवनात म्हणूनच पाण्याचे महत्व मोठे आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे, सर्व नैसर्गिक स्त्रोतांचा अतिवापर आणि शोषणामुळे मानवाला पाण्याच्या तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

हे संकट भविष्यात आणखी वाढू शकते. पाणी हा सर्व सजीवांच्या अस्तित्वाचा एक महत्त्वाचा घटक असल्याने, पाण्याचे महत्त्व आणि त्यानुसार त्याची उपयुक्ततता याविषयी जागरूक करण्यासाठी जगभरात दरवर्षी २२ मार्च हा 'जागतिक जल दिन' म्हणून साजरा केला जातो.

World Water Day 2024
उन्हाळ्यात फ्रिजमधले थंड पाणी प्यावे का? किती असावं प्रमाण!

जागतिक जल दिनाचा इतिहास काय?

जगाला पाण्याच्या गरजेविषयी जागरूक करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक जल दिन साजरा करण्यास सुरूवात केली. १९९२ मध्ये ब्राझीलच्या रिओ दि जानेरो येथे आयोजित केलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकास परिषदेत (UNCED) जागतिक जल दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

त्यानंतर १९९३ पासून पाण्याच्या संरक्षणाचे महत्व समजून घेण्यासाठी सामुदायिक जागरूकता वाढविण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जाऊ लागला. पहिल्या जागतिक जल दिवसाचे आयोजन २२ मार्च १९९३ साली करण्यात आले होते.

World Water Day 2024
Cucumber For Summer: उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने होतात ४ फायदे

जागतिक जल दिनाचे महत्व

संयुक्त राष्ट्राच्या वेबसाईटनुसार जागतिक जल दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा 2030 पर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता हे आहे. त्यासाठी पाणी जपून वापरणे आणि पाण्याची जास्तीत जास्त बचत करण्याला समर्थन करणे. पाणी वाचवणे हे किती गरजेचे आहे, याचे महत्व लोकांना पटवून देणे हे देखील गरजेचे आहे.

पाणी हे आपल्या सर्वांचे जीवन आहे. ते आपले मूळ स्त्रोत आहे. पाण्याच्या अभावामुळे अनेक समस्या येऊ शकतात. पाण्याशिवाय लोकांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. त्यामुळे, याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना याचे महत्व पटवून देणे गरजेचे आहे.

World Water Day 2024
उन्हाळ्यात Acidity होतेय! हे पाच पदार्थ ठरतील फायद्याचे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com