Job Security: तुमचा Job धोक्यात तर नाही ना? Office मधले हे संकेत लक्षात येताच व्हा सतर्क

ऑफिसमध्ये वरिष्ठ किंवा मॅनेजमेंटकडून मिळणारे काही संकेत तुमच्या वेळीच लक्षात आले तर तुम्ही तुमची नोकरी वाचवू शकता किंवा वेळीच दुसरी नोकरी शोधू शकता. या काही संकेतांबद्दल किंवा नोकरी वरून काढण्यासाठी जबाबदार असलेल्या कारणांबद्दल आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत
Job Security
Job SecurityEsakal
Updated on

Job Security: नोकरदार व्यक्तीसाठी त्याची नोकरी ही अत्यंच महत्वाची असते. अनेकांचं घर, त्यांचं कुटुंब Family हे त्यांच्या नोकरीवर अवलंबून असतं. यासाठी नोकरी टिकवणं महत्वाचं असतं.

एखाद्या दिवशी जर तुम्हाला नोकरीवरून Job अचानक काढून टाकण्यात आलं तरं. अर्थातच कोणत्याही व्यक्तीसाठी ही परिस्थिती मोठी कठीण असते. नोकरी वरून काढून टाकण्याचे प्रकार अनेक कंपन्यांमध्ये घडत असतात. How to save yourself from loosing Job

खरं तर नोकरीवरून Job एखाद्या व्यक्ती कमी करण्याआधी काही दिवस त्याला वरिष्ठ किंवा कंपनी आणि संस्थेकडून काही विशिष्ट प्रकारचे संकेत दिले जातं असतात.

माज्ञ बऱ्याचदा हे संकेत एम्प्लाॅईच्या Employee लक्षात येत नाहीत आणि शेवटी नोकरीवरून काढून टाकल्याचा त्याला मोठा झटका बसतो. यासाठीच हे संकेत लक्षात घेणं गरजेचं आहे. 

ऑफिसमध्ये वरिष्ठ किंवा मॅनेजमेंटकडून मिळणारे काही संकेत तुमच्या वेळीच लक्षात आले तर तुम्ही तुमची नोकरी वाचवू शकता किंवा वेळीच दुसरी नोकरी शोधू शकता. या काही संकेतांबद्दल किंवा नोकरी वरून काढण्यासाठी जबाबदार असलेल्या कारणांबद्दल आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. 

१. नवं कौशल्य शिकत राहणं- सध्याचं जग हे स्पर्धेचं आहे. मग ती शाळा असो कॉलेज किंवा नोकरी. तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुम्हाला कायम नवं काही तरी शिकणं किंवा अपडेटेड राहणं गरजेचं आहे. यासाठी तुमच्या नोकरीत उपयोगी असलेल्या काही स्किल्स शिकणं गरजेचं आहे. 

तुम्ही यासाठी ऑनलाइन कोर्सचा पर्याय निवडू शकता. असा एखादा कोर्स करताना तुमच्या बॉसला याची नक्की माहिती द्या. याचा उपयोग नोकरी वाचवण्यासोबत तुमच्या बढतीसाठी देखील होवू शकतो. 

हे देखिल वाचा-

Job Security
High Salary Jobs: मुलांना या काही गोष्टी शिकवल्यात तर त्यांना भविष्यात मिळेल भरगोस पगाराची नोकरी

२. कमी काम करणं- जर गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनी किंवा वरिष्ठांकडून तुम्हाला कमी काम दिलं जात असेल तर याचा अर्थ तुमची नोकरी धोक्यात असू शकते. जास्त काम मिळणं म्हणजे कंपनीला तुमच्या कामावर विश्वास असून ते तुमच्यावर निर्धास्तपणे जबाबदारी देऊ शकता. 

यासाठीच मोठ्या जबाबदाऱ्या तसंच नवं काम करण्याची कायम तयारी दाखवा. ते काम वेळेत पूर्ण करा. यामुळे तुमचा नोकरीप्रति सकारात्मक दृष्टिकोन दिसून येईल.

३. तुमची वेतन वाढ- जर तुमच्यासोबतच्या सहकाऱ्यांच्या तुलनेत किंवा तुम्ही जे काम करताय, तुमचा जो हुद्दा आहे त्या तुलनेत जर तुमची पगार वाढ होत नसेल तर तुमच्या कामात कंपनीला काहीतरी कमतरता जावणतेय आणि ही एक धोक्याची घंटा असू शकते.

अशात कर्मचारी कपात झाल्यास त्यात तुमचा नंबरही लागण्याची शक्यता असते. यासाठीच पगार वाढ झाल्यानंतर ती जर कमी असेल तर त्यात समाधान न मानता त्या विषयी तुमच्या वरिष्ठाशी चर्चा करणं गरजेचं आहे. 

पगार वाढीबद्दल वरिष्ठांशी चर्चा करताना ती का कमी आहे हे आधी समजून घ्या. तुम्ही कुठे कमी पडताय, कोणच्या चुका सुधारणं गरजेचं आहे हे जाणून घेऊन पुन्हा जोमाने काम करण्याची तयारी दाखवा. 

४. तुमचा सल्ला विचारात न घेणं- जेव्हा एखाद्याची नोकरी धोक्यात असते किंवा कंपनीला त्या व्यक्तीची गरज नसते तेव्हा तिला कंपनीकडून किंवा काही वरिष्ठांकडून कमी महत्व दिलं जाऊ लागतं.

कंपनीतील किंवा तुमच्या टीममधील काही महत्वाचे निर्णय घेताना त्यात तुम्हाला सहभागी केलं जात नाही किंवा तुम्ही दिलेल्या सल्ल्याला महत्व दिलं जात नाही. 

अनेकदा टीम किंवा कंपनीच्या एखाद्या प्रोजेक्ट किंवा इतर महत्वाच्या प्रक्रियेपासून तुम्हाला दूर ठेवलं जातं. अशा वेळी हताश न होता तुम्ही बॉससोबत चर्चा करू शकता. 

५. वारंवार सूचना किंवा दबाव निर्माण करणं- प्रत्येक नोकरीमध्ये कामाचा दबाव हा असतोच. अनेक ठिकाणी टार्गेट्स असतात. मात्र जर इतरांच्या तुलनेत तुमची वारंवार परीक्षा घेतली जात असेल.

तुमच्या कामातून जाणून बुजून चुका शोधल्या जात असतील. त्यावरून तुम्हाला वारंवार सुचित कऱण्यात येत असेल. तर तुमची नोकरी धोक्यात असू शकते. 

तुम्ही काम करण्याची तयारी किंवा चांगलं काम करूनही कंपनी संतुष्ट होत नसेल तर येत्या कर्मचारी कपातीत तुमचा समावेश असू शकतो असं समजावं. 

अशा प्रकारे जर नोकरीच्या ठिकाणी काही बदल जाणवले तर वेळीच सतर्क होणं गरजेचं आहे. अचानक नोकरी जाण्याएवजी आधीच कंपनी किंवा वरिष्ठांसोबत चर्चा करावी.

काही वेळेस कामात सुधारणा केल्यास तुमची नोकरी वाचण्याची शक्यता असते. नोकरी जाण्याची भीतीने निराश न होता यावेळी सकारात्मकतेने कामात बदल करणं गरजेचं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com