
मुलांना या काही गोष्टी शिकवल्यात तर त्यांना भविष्यात मिळेल भरगोस पगाराची नोकरी
मुंबई : प्रत्येक पालकाला वाटत असते की आपल्या मुलांना भविष्यात लाखो रुपये पगाराची नोकरी मिळावी; जेणेकरून त्यांना आपले आयुष्य निवांत जगता येईल. तुमची ही इच्छा पूर्ण करायची असेल तर तुमच्या मुलांना काही गोष्टी शिकवणं गरजेचं आहे. भविष्यात माणसाची जागा रोबोट घेतील असे दिसत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत टिकून राहायचे असेल तर आधुनिक काळाची गरज ओळखून त्यानुसार मुलांना शिक्षण देणे गरजेचे आहे.
कोडींग
व्हिज्युअल ब्लॉक प्रोग्रामिंग भाषांद्वारे मुलांना वयाच्या चौथ्या वर्षापासून कोडींग शिकवले जाऊ शकते. ७ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील मुले टेक्स्ट आधारित कोडींग शिकू शकतात. एका आकडेवारीनुसार २०२४ सालापर्यंत सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग नोकऱ्यांमध्ये १८.८ टक्के आणि कम्प्युटर सिस्टीम विश्लेषकांच्या नोकऱ्यांमध्ये २०.९ टक्के वाढ होईल.
गणित-विज्ञान
आजकाल जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये गणित-विज्ञानाचे ज्ञान आवश्यक असते. गणित तर्कबुद्धी, क्रिटीकल थिंकींग, समस्या निराकारण इत्यादी गोष्टी शिकवते. त्यामुळे व्यावसायिक क्षेत्रात काम करताना गणित आणि विज्ञान उपयुक्त ठरते.
विदा विश्लेषण (data analytics)
भविष्यात विदा विश्लेषणाला अधिक महत्त्व येणार आहे. या क्षेत्रातील कुशल कर्मचाऱ्यांची संख्या ७ वर्षांत ३० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
लिबरल आर्ट्स अॅण्ड ह्युमॅनिटीज
भविष्यात भरगोस पगार मिळवून देणाऱ्या नोकऱ्यांमध्ये क्रीटीकल थिंकींग, लेखनकौशल्य, अध्ययनकौशल्य, सर्जनशीलता आणि संवादकौशल्य, इत्यादी गुणांना बराच वावा निर्माण होणार आहे. या सर्व गोष्टी लिबरल आर्ट्स अॅण्ड ह्युमॅनिटीज क्षेत्राशी संबंधित आहेत.