चालता-फिरता पायात सतत Cramps येतात, या गोष्टींच्या कमतरतेने स्नायूंमध्ये होतात वेदना

क्रॅम्पस् येणं किंवा स्नायूंमध्ये वेदना निर्माण होणं सामान्य बाब असली. तरी जर तुम्हाला सतत क्रॅम्पस् येत असतील तर शरीरात काही गोष्टींची कमतरता Deficiency झाली आहे असं समजावं
मसल क्रॅम्पस थांबवण्यासाठी
मसल क्रॅम्पस थांबवण्यासाठीEsakal
Updated on

अनेकदा व्यायाम करताना किंवा जलद चालत असताना क्रॅम्प म्हणजेच स्नायूंमध्ये वेदना निर्माण होतात. मसल्स क्रॅम्प किंवा स्नायूंमध्ये काही वेळेस वेदना Pain निर्माण होणं ही एक सामान्य बाब आहे. How to treat deficiencies which creates muscle cramps

यासाठी विविध कारणं जबाबदार असतात. अनेकदा एकाच स्थितीत अनेक तास बसल्याने किंवा झोपल्याने पायात पाठीमध्ये क्रॅम्प येतात. काहीवेळेस जेव्हा एकापेक्षा जास्त स्नायू अचानक आकुंचन पावतात आणि घट्ट होतात तेव्हा क्रॅम्प Muscle Cramps येतात. यावेळी प्रचंड वेदना होतात.

मात्र हळूहळू स्नायू किंवा ठराविक अवयव रिलॅक्स केल्यास या वेदना कमी होवू लागतात. काही खास स्थितीत किंवा कधीतरी असे क्रॅम्पस् येणं किंवा स्नायूंमध्ये वेदना निर्माण होणं सामान्य बाब असली. तरी जर तुम्हाला सतत क्रॅम्पस् येत असतील तर शरीरात काही गोष्टींची कमतरता Deficiency झाली आहे असं समजावं.

स्नायूंमध्ये सतत येणारे क्रॅम्पस् किंना तीव्र कळा या काही वेळेस शरीरातील काही घटकांच्या कमतरतेचे संकेत असतात. त्यामुळे सतत येणाऱ्या क्रॅम्पसकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे स्नायूंमध्ये वेदना

स्नायूंमध्ये वारंवार येणाऱ्या क्रॅम्पससाठी कॅल्शियमची कमतरता हे देखील एक महत्वाचं कारण आहे. यालाच हायपोकॅल्सीमियाचं लक्षण म्हंटलं जातं. यामध्ये अनेकदा तोंडाच्या आसपासचा भाग सुन्न होणं तसचं स्नायू अवघडणं किंवा स्नायूंमध्ये वेदना अशी लक्षणं दिसून येतात.

हाता-पायांमध्ये देखील वरचेवर स्नायू खेचले जातात. अशा समस्या वारंवार दिसू लागल्यास कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली आहे हे लक्षात घ्या.

हे देखिल वाचा-

मसल क्रॅम्पस थांबवण्यासाठी
Symptoms Of Weak Muscles : स्नायूंच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका, स्वामी रामदेवांनी सांगितली कारणं आणि उपाय!

ड जीवनसत्वाची कमतरता

शरीरासाठी व्हिटॅमिन डी म्हणजेच ड जीवनसत्व अत्यंत गरजेंचं आहे. ड जीवनसत्वाची कमतरता निर्माण झाल्यास हाडं कमकुवत होवून हाडांच्या समस्या निर्माण होवू लागतात. तसंच थकवा आणि स्नायू अवघडणं किंवा सतत क्रॅम्प्स येणं अशा समस्या निर्माण होतात.

व्हि़टॅमिन डीमुळे स्नायू आणि हाडांच्या थरांना पोषण मिळतं. जेणेकरून स्नायू आणि हाडं मजबूत होण्यास मदत होते.

यामुळेत जर तुम्हाला सतत स्नायू अवघडणं किंवा स्नायूंमध्ये क्रॅम्प्स येत असतील तर शरीरात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली आहे हे लक्षात घ्यावं.

स्नायूंमधील क्रॅम्प्सची समस्या दूर करण्यासाठी करा हे उपाय

सर्वप्रथम आहारामध्ये कॅल्शियमयुक्त पदार्थ म्हणजेच दूध, पनीर, अंडी अशा पदार्थांचा समावेश करावा.

तसंच पुरेश्या सुर्यप्रकाशात काही मिनिटांसाठी एक वॉक घ्या. त्याचसोबत आहारामध्ये पालक, संत्री, अक्रोड अशा पदार्थांचा समावेश वाढवा.

काही वेळेस चुकीच्या बसण्याच्या किंवा झोपण्याच्या पद्धीतींमुळे तसचं व्यायामाअभावी देखील स्नायू अवघडले जातात आणि स्नायूंमध्ये वेदना निर्माण होतात. यासाठी झोपण्यापूर्वी किंवा शक्य तेव्हा स्ट्रेचिंगचे काही व्यायाम करा.

हे देखिल वाचा-

मसल क्रॅम्पस थांबवण्यासाठी
Muscle Gain Tips: खाल्लेलं अंगाला लागेना, मग फक्त वर्कआऊट करून कसं चालेल? हे पण करा

तसंच दिवसभरामध्ये पुरेसं पाणी पिणं गरजेंच आहे. दिवसभरात २-३ लिटर पाणी प्या. यामुळे शरीरासोबतच स्नायूंच्या पेशी हायड्रेट राहण्यास मदत होते. कारण अनेकदा पाण्याच्या कमतरतेमुळे देखील स्नायूंमध्ये क्रॅम्प्स येतात.

तसचं क्रॅम्प्समुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी तुम्ही गरम किंवा थंड शेक घेऊ शकता. यामुळे आराम मिळेल.

त्याचसोबत काही हर्बल किंवा लवंग तेलाने मसाज केल्यासही स्नायूंमधील वेदना कमी होण्यास मदत होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com