Muscle Memory : बॉडी स्ट्राँग करणारी ही मसल्स मेमरी म्हणजे नेमके काय? जाणून घ्या सविस्तर

शरीराच्या तंदूरुस्तीसाठी महत्वाची समजली जाणारी मसल्स मेमरी नेमकी काय असते..
Muscle Memory
Muscle Memoryesakal

What Is Muscle Memory And How It Straightens Body : आपल्या रोजच्या हालचालींसाठी मसल्स मेमरी आवश्यक असते. पण एवढेच पुरेसे नाही. मसल्स मेमरी शारीरिक हालचाली आणि त्यांची गती यापेक्षाही अधिक काहीतरी असते. हे समजून घेण्यासाठी पहिले मसल्स मेमरी म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे.

मसल्स मेमरी म्हणजे काय?

मसल्स म्हणजे स्नायू आणि मेमरी म्हणजे स्मरणशक्ती, असा सोपा अर्थ काढला जातो. पण म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया. आपल्या शरीराचे अवयव विशिष्ट क्रिया लक्षात ठेवतात. एखादी गोष्ट, कृती शरीराने केलेली असेल तर ती लक्षात राहणे म्हणजे मसल्स मेमरी.

शिकवलेल्या गोष्टी लक्षात राहणे म्हणजे न्युरोलॉजिकल मेमरी आणि शारीरिक हालचाली लक्षात राहणे म्हणजे मसल्स मेमरी असे दोन प्रकार विज्ञानाने सांगितले आहेत. मेंदूच्या स्मरणशक्तीत मसल्स मेमरीचाही समावेश असतो. त्यामुळे लहानपणी शिकलेल्या शारीरिक क्रिया मोठेपणीही करता येतात.

Muscle Memory
Muscle Strength : ३ सोप्या उपायांनी स्नायू बळकट करा आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवा

मेंदू आणि पाठीचा कणा यांच्या मध्यावर्ती असणाऱ्या मज्जासंस्थेमध्ये हालचालींची स्मरणशक्ती असते. म्हणजेच विशिष्ट शारीरिक हालचाली, क्रिया पुन्हा पुन्हा विशिष्ट क्रमाने केल्या जातात आणि त्यांच्यात सुधारणा केल्या तरी त्या लक्षात ठेवल्या जातात. या विशिष्ट क्रियांमुळे शरीराचे सर्व भाग सक्रिय राहतात.

अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासानुसार मेंदू विविध हालचाली, कौशल्ये साठवून घेत असते. पण मेंदू त्यात अपग्रेडेशन करत असल्याचे लक्षात आले आहे. आपल्या हालचाली अधिक सूचक, सुसंगत आणि सहज होण्यासाठी मेंदू प्रयत्न करत असतो.

Muscle Memory
Strong Muscles : स्नायू बळकट बनवायचे असतील तर हे खा

कालांतराने या हालचालींची एवढी सवय होते की, आपले लक्ष इतरत्र असले तरी त्या हालचाली घडत असतात. या हालचाली प्रत्येक व्यक्तीच्या उंची, वजन आणि शारीरिक क्षमता यानुसार थोड्याफार बदलत असतात.

शारीरिक मसल्स मेमरी

शरीर जर कमकूवत झालं किंवा काही कारणाने हालचाली अनियमित झाल्या तर आपले शरीर स्वतःहून रिकव्हर होते. नैसर्गिकरित्या बरे होते. जर स्नायू शरीराच्या अवयवांचे कार्य विसरले नसेल तर लवकर बरे होते. कारण नवीन पेशी बनवण्याचे काम चालूच असते. मसल्स मेमरी ही स्नायूंच्या बळकटीस अधिक महत्वाची ठरते. कारण स्नायू तयार व्हायला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळात मसल्स मेमरीमुळे स्नायू बळकटीकरणासाठी लागतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com