Hug Day 2024: हग डे ला जोडिदाराला द्यायचंय खास गिफ्ट? झटपट बनवा Heart Shape पिझ्झा

हग डे ला जोडिदाराला गिफ्ट देऊन दिवसाला अजून खास बनवायचं असेल तर आम्ही खास रेसिपी घेऊन आलो आहेत.
Heart Shape
Heart Shapeesakal

Heart Shape Pizza Recipe : जर तुम्हाला तुमच्या पार्टनरला स्पेशल फील करून द्यायचं असेल तर तुम्ही हार्टशेप पिझ्झा बनवू शकतात. व्हॅलेंटाइन विकचा हा सहावा दिवस हग डे म्हणून साजरा होतो. हल्ली पिझ्झा सगळ्यांनाच आवडतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच पिझ्झा मोठ्या आवडीने खातात. त्यामुळे तुम्ही जर हा दिवस खास बनवायच्या विचारात असाल तर हा पर्याय अगदी योग्य ठरेल.

साहित्य

  • २ कप मैदा

  • अर्धा कप दूध

  • १ टी स्पून ड्राय यीस्ट

  • २ टी स्पून ऑलिव्ह ऑईल

  • गरजेनुसार पिझ्झा सॉस

Heart Shape
Hug Day : मित्राला अन् पार्टनरला मारलेल्या मिठीत काय फरक असतो?

टॉपिंग्ज

  • १ कप मशरुम

  • २ कांदे

  • शिमला मिरची २

  • १ कप पिझ्झी चीज

  • मोझेरेला चीज १ कप

  • चिली फ्लेक्स १ टी स्पून

Heart Shape
Hug Day Special Quotes : एक मिठी प्रेमाची, हग डे ला 'हे' खास संदेश पाठवा अन् प्रेम व्यक्त करा

कृती

  • एका मोठ्या भांड्यात मैदा घ्या. एका भांड्यात दूध गरम करून त्यात ड्राय यीस्ट आणि साखर मिक्स करा. दूध १०-१५ मिनीटांसाठी बाजूला ठेवा. जेव्हा दूधात यीस्टचा परिणाम दिसायला लागेल तेव्हा त्याला मैद्यात मिक्स करा. वरून थोडं तेलआणि चवीनुसार मीठ घालून कणीक मळून घ्या.

  • कणीक किमान ५ मिनीट मळा ज्यामुळे ती एकजीव आणि मऊ होईल. नंतर कणीक कापडात झाकून २ तास गरम जागी ठेवा. यावेळात कणीक यीस्टमुळे फुलून दुप्पट होईल.

  • आता मशरुम, शिमला मिरची, कांदा कापून घ्या. कणकेची जाड गोल पोळी लाटा. तिला हार्ट शेपमध्ये कापून घ्या. या पिझ्झा बेसवर काटे चमच्याने टोचून घ्या. नॉनस्टिक पॅन मीडियम आचेवर गरम करुन घ्या.या गरम पॅनवर पिझ्झा बेक टाकून कमी आचेवर शेकून घ्या.

  • जेव्हा बेस थोडा शेकला जाईल तेव्हा त्यावर २-३ टी स्पून पिझ्झा सॉस लावा. त्यावर खिसलेलं चीज, भाज्या घाला. झाकण लावून चीज वितळेपर्यंत शेकून घ्या. याला ३-४ मिनीट लागतात.

  • नंतर त्यावर चवीनुसार ओरेगानो, चीज, चीली फ्लेक्स घालून मनसोक्त आस्वाद घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com