Husband and Wife : 'या' कारणांमुळे होतात नवराबायकोत मोठे वाद

आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
Husband and Wife
Husband and Wifesakal

नवरा बायकोचे नाते हे खूप पवित्र आणि खास नाते मानले जाते. नवरा बायकोमध्ये छोट्या मोठ्या कारणांवरुन वाद होत असतात पण काही वाद हे कधी घटस्फोटाचे तर कधी नाते तुटण्याचे कारण ठरतात. अनेक कारणांमुळे नवरा बायकोमध्ये मोठे वाद होण्याची शक्यता असते. आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

  • अनेकदा जोडीदाराने आपली बाजू घ्यावी, असं आपल्याला नेहमी वाटत असतं पण ज्यावेळी जोडीदाराची बाजू घेण्याची वेळ येते तेव्हा समोरचा व्यक्ती काहीच माहित नाही असल्यासारखं वागतो. त्यामुळे नात्यात तणाव निर्माण होतो.

  • नवरा बायकोच्या नात्यात छोटे मोठे वाद होत असतात पण जेव्हा किरकोळ रागाच्या भरात हे वाद पुन्हा बरळले जातात तेव्हा भांडणे होण्याची शक्यता असते.

  • जेव्हा पार्टनला असं सातत्याने वाटतं की मला समजून घेतलं जात नाही तेव्हा नात्यात तेढ निर्माण होते.

Husband and Wife
Relationship Tips : नवरा-बायकोने झोपण्यापूर्वी मुळीच करू नयेत या गोष्टी
  • पार्टनरपासून कधीही कोणत्याही गोष्टी लपवू नका. असे केल्यास मोठा वाद आणि गैरसमज होण्याची शक्यता असते.

  • कोणत्याही नात्यात एकमेकांवर विश्वास ठेवणे, अत्यंत गरजेचं असतं पण जेव्हा पार्टनर समोरच्या पार्टनरवर अफेअर असल्याचा संशय घेतो तेव्हा नात्यात मोठं वादळ येण्याची शक्यता असते.

  • असं म्हणतात, आयुष्यभर प्रेम पुरत नाही. संसार चालवण्यासाठी आर्थिकदृष्ट्या बळकट असावं लागतं. अशात अतिप्रमाणात खर्च करणे किंवा काटेकोरपणे खर्च करत असल्याने याचा नकारात्मक प्रभाव नात्यावर पडत असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com