

Wife’s Male Friend and Husband’s Female Friend: Understanding Relationships
sakal
प्रश्न : माझ्या लग्नाला ८ महिने झाले आहेत. मी, माझे आई-वडील आणि पत्नी एकत्र राहतो. पत्नीचा शालेय जीवनापासूनचा एक मित्र वारंवार आमच्या घरी येतो. दोघे एकमेकांशी मोकळेपणाने अरे-तुरे करून बोलतात. मी घरी नसतानाही तो आमच्या घरी येऊन, अगदी बेडरूममध्ये बसून तिच्याशी गप्पा मारतो. हे वागणे मला व आई-वडिलांना आवडत नाही. मी पत्नीला याबाबत समजावण्याचा प्रयत्न केला; पण तिने मला संशयी ठरवले. ती म्हणते, की लग्न झाले म्हणून ती तिचे मित्र-मैत्रिणी सोडणार नाही. लग्नानंतर तिने या मैत्रीला काही मर्यादा घालाव्यात असे मला वाटते. मी काय करू?