Parenting Tips: पालकांच्या अति काळजीमुळे बिघडतेय तरुण पिढी? या चुका टाळा

प्रत्येक पालक आपल्या मुलांसाठी एक परफेक्ट आयुष्य इमॅजिन करत असतात
Parenting Tips
Parenting Tipsesakal

Hyper Parenting : प्रत्येक पालक आपल्या मुलांसाठी एक परफेक्ट आयुष्य इमॅजिन करत असतात, त्यांना आपल्या आयुष्यात कोणताही त्रास होवू नये, काहीही कमी पडू नये यासाठी ते खूप कष्ट करतात.

मुलं कितीही मोठी झाली तरी आपल्या आईबाबांसाठी ती लहानच असतात, त्यांना सतत असं वाटत असतं की आपल्याला आलेले अनुभव आपल्या मुलांना येऊ नयेत, आणि यात ते खूप पझेसिव्ह होतात..

Parenting Tips
Stroke-Heart Attack Risk in Winter: थंडीत बाथरूममध्येच जास्त हृदयविकाराचा झटका का येतो? जाणून घ्या कारण

हायपर पॅरेंटींग म्हणजे नक्की काय?

काही पालक त्यांच्या मुलांबद्दल अती पझेसिव्ह असतात. प्रत्येक छोट्या गोष्टीचे बारकाईने निरीक्षण करून त्यांना त्यांच्या मुलांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवायचं असतं.

अशा प्रकारचे पालकत्व ज्यामध्ये मुलाला जास्त प्रमाणात नियंत्रित किंवा मार्गदर्शन केले जाते, त्याला हायपर पॅरेंटिंग किंवा हेलिकॉप्टर पॅरेंटिंग म्हणतात.

याचा परिणाम असा होतो की मुलांना घरातलं वातावरण जेल वाटू शकतं.. खरंतर यात कोणाची चूक अशी नसते पण वाढत्या वयात मनाला न पटणारे निर्बंध मुलांवर लादल्याने मुलं बिथरायला लागतात

Parenting Tips
Bone Health : सावधान ! हे पदार्थ तुमची हाडे खिळखिळी करतात

सध्या सोशल मिडियावरती एक कोट फिरतो आहे, “घरात जेवढं शिस्तीचं वातावरण, मुलं तेवढीच बेफिकीर असतात.” एकंदरीत कोणत्याच व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीने कंट्रोल केलेलं आवडत नाही त्यात सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जर कोणी आपल्याला सतत हे नको करूस, असं नको वागूस असं काही सांगत असेल तर याचा एकावेळानंतर विपरीत परिणाम असा होतो की मुलं मोठे म्हणून ऐकून तर घेतात पण मनात एक अढी निर्माण होत जाते.

Parenting Tips
Travel Tips : हिवाळ्याच्या सुट्यांमध्ये कुठे जायचा प्रश्न पडलाय? अंदमानमधल्या या ठिकाणांना नक्की भेट द्या

त्यामुळे मुलांवरती जेवढे निर्बंध जास्त तेवढंच ते पालकांसाठी वाईट ठरू शकतं.. हायपर पॅरेंटींगची सुरुवात खूप आधीपासून होते, अनेकदा मुल पडलं की पालक खूप घाबरतात, त्याला अनेकदा हे करू नकोस ते करू नकोस असं म्हणत त्याला अडवणूक करतात आणि याने मुलाच्या विचारात खूप बदल घडतात.

Parenting Tips
Astro Tips : लांब पायाच्या महिला देतात धोका? सामुद्रिकशास्त्र सांगतं

1. मुलं आत्मविश्वास गमवतात

हायपर पॅरेंटींगमुळे पालक कोणताही निर्णय आपल्या मुलाला स्वतःहाने घेऊ देत नाही, प्रत्येका निर्णयात त्यांचा स्वतःचा एक मत असतं आणि तेच कसं बरोबर आहे यावरती ते ठाम असतात.

यामुळे जेव्हा बाहेरच्या जगात मुलांना निर्णय घेयची वेळ येते.. ते गोंधळतात, घरात खूप बिनधास्त वागणारी मुलं बाहेर मात्र चारचौघात पटकन कोणाच्या विरोधात बोलू शकत नाही कारण याची सवयच त्यांना नसते, मुळात त्यांची मतच कधी त्यांना मांडता येत नसतात.

Parenting Tips
Vastu Tips : शनिदोष सुरू झाला आहे? या रोपट्याने पडेल फरक!

2. घरच्यांपासून गोष्टी लपवतात

वाढत्या वयात मुलांना अनेक गोष्टींमधून जावं लागतं.. घरात आपल्या मनात असलेल्या गोष्टींवरून उगाच कोणीतरी ओव्हररिअॅक्ट करत आहे हे लक्षात आलं तर मुलं घरी गोष्टी सांगणं टाळतात.. ते मनातल्या मनात घरातल्यांबद्दल एक निगेटिव्ह इमेज तयार करतात आणि अशातून ते घरी मनमोकळं बोलणं टाळतात.

Parenting Tips
Saturday Astro Tips : शनिदेवांना तेल अर्पण करतांना चुकूनही या अवयवावर वाहू नका तेल, होईल नुकसान

3. आपल्या प्रॉब्लेम्ससाठी दुसऱ्यांना ब्लेम करतात

जर कधी नोटिस केलं तर लक्षात येईल की, लहान मुलं पडलं तर लगेच त्याचे आईबाबा म्हणतात की अरे काहीनाही उंदीर पळाला किंवा ज्या गोष्टीमुळे लागलं त्याला मारतात.. मुलाला त्याक्षणी हसवण्यासाठी हे करतात खरं पण याच्यामुळे होत असं की एका पद्धतीने आपण मुलांना त्या प्रॉब्लेमला फेस करण्याऐवजी त्यातून पळ काढत दुसऱ्याच एखाद्या गोष्टीवर ब्लेम करतो.. ही सवय इतकी वाढते की मुलं आपल्या चुकांसाठी सतत दुसऱ्यांवर ब्लेम करू लागतात.

Parenting Tips
Healthy Lifestyle : एक्सपर्ट म्हणतात, "डाएट करू नका..."

4. सतत कन्फ्युज असतात

एकंदरीत सतत मुलाची पाठराखण त्याच्या बद्दलचा ओव्हर पझेसिव्हनेस याने मुलाला कोणताच निर्णय घेता येत नाही.. कोणत्याही प्रसंगाला सामोरं जावं लागत नाही. यामुळे मुलं आपल्या आयुष्यातल्या अनेक निर्णयांबद्दल कन्फ्यूज असतात. अनेकदा ते निर्णय घेउच शकत नाही आणि स्वतःच्याच क्षमतेवर संशय घेतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com