
बऱ्याच मुलींना असं वाटतं की श्रीमंत मुलाशी लग्न केलं तर आपलं आयुष्य सुखात जाईल. पण पैसा आला की फक्त सुखच येतं असं नाही. त्याचे काही तोटेही आहेत.
प्रेमाने पोट भरत नाही असं म्हणणं अजिबात चुकीचं नाही. पण केवळ पैसाच तुमचं वैवाहिक जीवन आनंदानं भरून टाकू शकतो, असं मानणंही योग्य नाही. पण हे आजच्या काळात घडत आहे, बहुतेक मुली त्यांच्या जीवनसाथीमध्ये पार्टरनचा स्वभाव किंवा मन पाहण्याऐवजी त्यांच्या सामाजिक स्थिती आणि उत्पन्नाला अधिक महत्त्व देत आहेत.
इतकंच नाही तर अनेक वेळा श्रीमंत नवरा मिळवण्याच्या हव्यासापोटी मुली आपल्यावर खूप प्रेम करणाऱ्या मुलांनाही सोडतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही स्वतःसाठी श्रीमंत नवरा शोधत असाल, तर प्रथम तुम्हाला अशा व्यक्तीसोबत नातेसंबंधात राहण्याचे काही तोटे जाणून घेणं आवश्यक आहे.
जर तुम्ही एखाद्या श्रीमंत माणसाशी लग्न केले तर तुम्ही त्याची प्रायोरिटी कधीच नसाल हे आधीच मान्य करा. कारण कोणतीही श्रीमंत व्यक्ती सामान्य उत्पन्न असलेल्या व्यक्तीपेक्षा जास्त बिझी असतो. असंही होऊ शकतं की कधीकधी तुम्हाला तुमच्या गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते. अशा रिलेशनशिपमध्ये राहणं कोणत्याही महिलेसाठी अत्याचारापेक्षा कमी असू शकत नाही.
प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की तिच्या पतीने तिला धीर द्यावा, जेव्हा ती रागवेल तेव्हा, रोमँटिकपणे बोलावं. पण इतकी मेहनत आणि वेळ घालवण्याऐवजी श्रीमंत नवरा महागडी भेटवस्तू देऊन तुमच्या सर्व तक्रारी सोडवू शकतो. सुरुवातीच्या काळात तुम्हाला या गोष्टी खूप भारी वाटू शकतात. पण काही काळानंतर तुम्हाला समजेल की तुमचा नवरा तुमच्या सर्व भावनांची किंमत मोजत आहे.
श्रीमंत पतीशी लग्न केल्यानंतर, तुम्हाला त्या सर्व सुखसोयी मिळू शकतात ज्यांचं तुम्ही आतापर्यंत फक्त स्वप्न पाहिलं होतं. पण पतीसोबत निवांत वेळ मिळणं अवघड होईल. त्याच्या बिझी शेड्युलमुळे अनेकवेळा रात्रीचे जेवण, शॉपिंग एकट्यानं करावं लागेल.एवढंच नाही, तो सतत व्यवसाय, नोकरी, पैसा याबद्दलचाच विचार करत राहील.
श्रीमंत माणसाला दिशाभूल करण्याच्या अधिक संधी उपलब्ध असतात. कारण तो घरी बायको आणि मुलांसोबत कमी वेळ घालवतो आणि ऑफिसमधल्या लोकांच्या सहवासात जास्त वेळ घालवतो, जिथं इतर स्त्रियाही असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या नवऱ्याबद्दल असुरक्षित वाटत राहील. त्याचं बाहेर अफेअर असण्याचीही दाट शक्यता आहे.
स्वतःहून श्रीमंत व्यक्तीशी लग्न केल्यावर तुम्हाला तुमची स्वतःची अशी ओळख उरणार नाही. तुम्ही तुमचं मत तुमच्या पतीसमोर मोकळेपणाने मांडू शकणार नाही. सोन्याच्या पिंजऱ्यात कैद झाल्यासारखं वाटेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.