Toxic Relation : क्षणात उद्ध्वस्त होवू शकतो तुमचा सुखी संसार... नको असेल तर आजच टाळा या चुका

कपलच फार छान सुरु असतं पण अचानक काहीतरी बिघडतं आणि ते दोघे वेगळे होतात
Toxic Relation
Toxic Relationesakal

Healthy Relationship Tips : अनेकदा आपण बघतो की एका कपलच फार छान सुरु असतं पण अचानक काहीतरी बिघडतं आणि ते दोघे वेगळे होतात. पण याचं काही कारण कळत नाही. सध्या घटस्फोटांची संख्या सतत वाढते आहे. याचा अर्थ असा नाही की सुखी असं कोणतच कपल नाही. असेही कपल आहेत जे एकमेकांसोबत खूप सुखी आहेत.

कोणत्याही नात्यात सर्वात महत्वाच्या तीनच गोष्टी असतात. प्रेम, विश्वास आणि सुसंवाद. या तीन गोष्टी असतील तर कोणतंही नातं परिपक्व होतं आणि दीर्घकाळ टिकतं. वैवाहिक जीवनात एकमेकांच्या प्रती प्रेमाची भावना असणं खूप गरजेचं असतं. पती-पत्नीमधील समजूतदारपणा, बॉंडिंग आणि सुसंवाद त्यांना कायम एकत्र ठेवतो.

Toxic Relation
Healthy Relationship : ज्या पुरुषांच्या बायका हेल्दी असतात ते जास्त खुश का असतात? कारण...

पण अनेकदा काही प्रसंग असे येतात त्याने त्या नात्याला वेगळंच स्वरुप येतं. त्या नात्यात प्रेमाऐवजी भीती आणि द्वेषाची भावना निर्माण व्हायला सुरुवात होते आणि मग ज्या नवऱ्यासाठी मुलीने तिचे हक्काचे घर माहेर सोडलं होतं, तीच त्याच्यापासून दूर राहण्याचा मार्ग निवडण्यास भाग पडते.

Toxic Relation
Healthy & Happy Relationship : नातं घट्ट होण्यासाठी रोजच्या जीवनात फॉलो करा 'या' टिप्स

आताच्या स्त्रिया पूर्वी सारख्या सोशीक नाही. त्यांना चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणता येतं. जे खरंतर बरोबरच आहे. उगाच कारण नसतांना आणि मुळात आपली चूक नसतांना ऐकून तरी का घ्यावं?आत्ताच्या स्त्रिया स्वावलंबी आहेत. स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात आणि सर्वात म्हणजे आपली जाबबादरी घेऊ शकतात. अशात त्यांनी उगाच मन मारुन जगणं बरोबर नाही.

Toxic Relation
Relationship Tips: स्वावलंबी मुलीशी लग्न करायचं आहे? मग वागायची बोलायची शिकून घ्या रे तऱ्हा...

अशात जर चुकूनही अशा गोष्टी नात्यात घडल्या तर तुमचा कितीही सुखाचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. त्यामुळे काहीही झालं तरी पुरुषांनो या चुका स्वप्नातही करु नका.

1. फसवणूक

कोणत्याही नातेसंबंधात, प्रेम आणि बॉंडिंगपेक्षाही जास्त महत्त्वाचे असे काही असेल तर ते म्हणजे जोडप्याची एकमेकांबद्दलची प्रामाणिकता. विश्वास ही अशी गोष्ट आहे जी चुकूनही ढासळली तर नातं कितीही जुन असो तुटायला क्षण पुरे असतो. ही एक अशी गोष्ट आहे जिच्याशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत पती आपली फसवणूक करत असल्याचे पत्नीला कळले तर ते सहन करणे तिच्या क्षमतेत नाही. यामुळे ती पूर्णपणे खचते आणि प्रेमाचे रुपांतर द्वेषात होते.

Toxic Relation
Relationship Tips : मुलांनो ! लग्नासाठी मुलगी शोधण्याआधी या गोष्टी समजून घ्या; तरच टिकेल नातं

2. पत्नीवर हात उचलणे

घरगुती हिंसाचार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाऊ नये. यासाठी काही कायदेही आहेत, जे या परिस्थितीतून महिलांना संरक्षण आणि न्याय देण्यास मदत करतात. नवऱ्याने हात उचलला त्याला कायद्याने तर शिक्षा होतेच पण नात्यातही राग आणि द्वेष वाटणे स्वाभाविक आहे. ही गोष्ट स्वाभिमानची आहे, अशात जर त्यांच्यावर हात उगारला जात असेल तर त्याचे समर्थन कोणत्याही पद्धतीत चुकीचे आहे.

Toxic Relation
Relationship Tips : सेक्सचा हा फंडा माहीत असेल तर कमी वेळ देऊनही पार्टनर होणार नाही नाराज

3. मानसिक छळ

छळ हा केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आणि भावनिक सुद्धा असतो. उलट शारीरिक छळापेक्षा मानसिक छळ अजून वाईट हा व्यक्तीला आतून तोडतो शिवाय यामुळे ती व्यक्ति अनेकदा आयुष्यभर त्यातून सावरु शकत नाही. लहानपणी खेळता खेळता एखाद्या नातेवाईकाने घाबरवले असेल तरी आपण त्यांच्याकडे लवकर जात नाही अशात जर ज्यावर आपण आपला जीव उधळला अशा व्यक्तीने आपला छळ केला तर त्याच्या बाबत मनात प्रेम उरेल तरी कसं?

Toxic Relation
Relationship Tips : कधीतरी बोला खोटं; नातं होईल अधिक घट्ट

4. मुलांबद्दल हिंसक वर्तन

पती-पत्नीमध्ये सर्व काही ठीक आहे, असे अनेकवेळा दिसून येते, पण बाप म्हणून पुरुष मुलांवर हिंसक असतो. जेव्हा मुलांशी अशी वृत्ती असते तेव्हा कोणत्याही स्त्रीला ते सहन करणे अशक्य होते. यामुळेच अनेक स्त्रिया आपल्या मुलांना वेगळे होवून वाढवण्याचा निर्णय घेतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com