
Independence Day 2025 Marathi Wishes: स्वातंत्र्य दिन हा भारताच्या गौरवशाली इतिहासाचा आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानांचा उत्सव आहे. 15 ऑगस्टला साजरा होणारा हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या हृदयात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित करतो. यंदा७९ वा स्वांतत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. देशभरात मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो. अनेक शाळा आणि महाविद्यालय, तसेच शासकिय कार्यालयात देखील हा दिवस देशभक्तीने साजरा केला जातो. "विजयी विश्व तिरंगा प्यारा" ही थीम आपल्या तिरंग्याच्या अभिमानाचे आणि राष्ट्रीय एकतेचे प्रतीक आहे. या स्वातंत्र्य दिनानिमित्त, आपल्या मित्रपरिवाराला मराठीतून देशभक्तीपूर्ण शुभेच्छा पाठवून हा उत्साह साजरा करा.