Basmati Rice : भारत-पाकिस्तान फाळणीवेळी 'त्यांनी' निर्णय घेतला म्हणून आपल्याला मिळाला इंडिया गेट बासमती तांदूळ

दोन भावांनी कमाल केली अन् प्रत्येक घरात पोहोचला इंडिया गेट बासमती तांदूळ
Basmati Rice
Basmati Riceesakal

India Get Basmati Rice :

बिर्याणी व्हेज असो वा नॉनव्हेज, किंवा एखाद्या लग्नातील पुलाव तांदूळ तर एकच तो म्हणजे इंडिया गेट बासमती राईस. इंडिया गेट बासमती तांदूळ हा देशातील एक मोठा ब्रँड बनला आहे. लांब, पातळ आणि सुवासिक बासमती तांदूळ पॅक करून इंडिया गेटच्या नावाने विकणारी KRBL या कंपनीचा खूप जुना इतिहास आहे. भारत - पाकिस्तानच्या फाळणीआधी या तांदळाचा जन्म झाला आहे. जो आज देशातला सर्वात मोठा ब्रँड बनला आहे.

भारतात राहणाऱ्या खुशी राम आणि बिहारी लाल या दोन भावांनी 1889 मध्ये लायलपूर येथे तांदूळ, तेल आणि गहू यांचा छोटासा व्यवसाय सुरू केला. लायलपूर आता पाकिस्तानचा भाग आहे. जेव्हा भारत-पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा दोन्ही भावांनी पाकिस्तान सोडून भारतात राहण्याचा निर्णय घेतला आणि ते दिल्लीत आले.

Basmati Rice
Business Success Story: रतन टाटांच्या मदतीने सुरू केली कंपनी; आज दर महिन्याला कमावतायत कोट्यवधी रुपये

इंडिया गेट बासमती ब्रँडची यशोगाथा

या दोघांनी लाहोरी गेटजवळ व्यवसाय सुरू केला. KRBL नावाची कंपनी स्थापन केली. ते यशस्वी करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. मेहनत फळाला आली आणि  पुढच्या काही वर्षांत 'इंडिया गेट बासमती राइस' हा एक मोठा ब्रँड बनला. आज हा तांदूळ भारतातील प्रत्येक घरात पोहोचला आहे.

1980 मध्ये  KRBL ने  पहिल्यांदा बासमती तांदळाची पाकिटे रशियन बाजारपेठेत पुरवली. त्यानंतर कंपनीच्या बासमती तांदळाची मागणी भारताशिवाय इतर अनेक देशांमध्ये वाढू लागली. कंपनीने जागतिक स्तरावर ब्रँड लाँच करण्याचा निर्णय घेतला आणि वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी जर्मनीमधून विशेष मशीन्स आयात करण्यात आल्या.

Basmati Rice
Retirement Age मध्ये सुरू केला Business, २० महिलांना दिला रोजगार, मधु प्रकाश यांची प्रेरणादायी कहाणी

अशाप्रकारे, 1993 मध्ये, कंपनी KRBL ने आपला फ्लॅगशिप ब्रँड 'इंडिया गेट' पॅकेज्ड स्वरूपात सादर केला. KRBL लिमिटेडच्या डायरेक्टर प्रियांका मित्तल सांगतात की, कंपनीने सुरुवातीपासूनच आम्ही आणि विक्रेते दोघांनाही फायदा व्हावा यासाठी दलालांना दूर करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. ज्याच्या आधारावर, आज KRBL हा लाहोरी गेट, दिल्लीचा धान्य आणि मसाल्यांचा सर्वात जुनी कंपनी आहे.

या कंपनीने 'माँ के हाथ का खाना' या मोहिमेद्वारे पॅकेज केलेल्या बासमती तांदळाची जाहिरात करण्यास सुरुवात केली. याशिवाय 'इंका फेव्हरेट पुलाव' मोहिमेद्वारे कंपनी आपल्या ग्राहकांना इंडिया गेट खरेदी करण्यास सांगत आहे.

जर आपण इंडिया गेट बासमती तांदळाच्या संपूर्ण प्रवासावर नजर टाकली तर स्वातंत्र्यापूर्वी सुरू झालेला एक छोटासा व्यवसाय आता 4,000 कोटी रुपयांच्या उत्पन्नासह एक यशस्वी व्यवसाय म्हणून उभा आहे. त्याने 1998 मध्ये कंपनीने स्वत:चा IPO लाँच केला. त्याच्या वार्षिक अहवालानुसार, KRBL चा आर्थिक वर्ष 2021 मध्ये महसूल 3991 कोटी रुपये होता. सध्या 95,000 शेतकरी कंपनीशी निगडीत आहेत. (Business Idea)

Basmati Rice
Business Idea  : लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करणारा स्टार्टअप, श्रितीची इको फ्रेंडली आयडिया पोहोचलीय सातासमुद्रापार

विशाल नेटवर्कसह KRBL अंतर्गत 14 ब्रँड लाँच केले. या शेतकऱ्यांकडून तांदूळ खरेदी केला जातो. कंपनीचा दावा आहे की ते आपल्या ग्राहकांना उच्च दर्जाचे तांदूळ देतात, जे लोकांना खूप आवडले. प्रियांका म्हणते की, आमच्याकडे असलेल्या सर्व ब्रँडपैकी इंडिया गेट बासमती तांदूळ हा फ्लॅगशिप ब्रँड आहे.

पुढे जाऊन, कंपनी शाश्वत शेती पद्धती आणखी मजबूत करण्याची योजना आखत आहे. ज्यामुळे शेतीकडे तरूणांचा कल वाढेल आणि अनेक रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील.

Basmati Rice
Business Idea : गुंतवणूक कमी अन् जास्त नफा! दिवाळीपूर्वी हे 5 सिझनेबल व्यवसाय सुरू करा, होईल फायदाच फायदा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com