Partition Day: शाळांमधील 'फाळणी स्मरणदिना' विरोधात पवार आक्रमक; 'इंडिया' आघाडीला 'हे' महत्वाचं आवाहन

याद्वारे मोदी सरकारकडून समाजात तेढ, द्वेष पसरवण्याचा काम सुरु असल्याचा आरोप पवारांनी केला आहे.
Sharad Pawar
Sharad Pawaresakal

संभाजीनगर : केंद्रातील मोदी सरकारकडून वारंवार समाजात तेढ आणि द्वेष पसरवण्याचा काम सुरु आहे. यामुळं देशभरात उन्मादाचं प्रमाणंही वाढलं आहे. सीबीएसईनं शाळांमध्ये 'फाळणी स्मरणदिन' साजरा करण्यासाठी नुकतंच पत्रक काढलं.

याला आक्रमकपणे विरोध करण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Partition Day in Schools be aggressive against it Sharad Pawar will be appeal to INDIA members)

Sharad Pawar
Sharad Pawar on Ajit Pawar: "मी लहान लोकांवर भाष्य करणार नाही"; शरद पवारांचा अजित पवारांवर निशाणा

पवार म्हणाले, "समाजात जो उन्माद वाढला आहे, यामागं मोदी सरकारचे निर्णय आहेत. या निर्णयांमुळं लोकांमध्ये कटुता वाढते आहे. याचं ताजं उदाहण म्हणजे आपल्या देशात इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत ज्या सीबीएसईच्या नियंत्रणाखाली चालतात. (Latest Marathi News)

या सीबीएसईला केंद्राच्या संस्थेकडून मार्गदर्शन केलं जातं. १० ऑगस्ट रोजी या सीबीएसईनं नवं परिपत्रक काढत १४ ऑगस्ट २०२३ हा दिवस 'फाळणी स्मरण दिन' साजरा करण्याचा निर्णय घेतला. फाळणीच्या घटनेमुळं जी कटुता निर्माण झाली होती त्यातून देश बाहेर येत असताना केंद्रानं याचं स्मरण करा म्हणतं आहे. याविरोधात निषेध आंदोलन केलं पाहिजे. (Marathi Tajya Batmya)

Sharad Pawar
Nana Patole: काँग्रेसचा 'प्लॅन बी', पवारांबाबत भूमिका काय? नाना पटोलेंनी थेटच सांगितलं

आक्रमकपणे विरोध करा

याचा अर्थ स्पष्ट होतो की, हे सरकार समाजात कटुता निर्माण करणं, जातीधर्मात तेढ वाढवणं आणि अंतर वाढवण्याचं काम करत आहे. त्यामुळं आम्ही महाविकास आघाडी इंडियाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करणार आहोत.

या आघाडीतील सर्व सदस्यांच्या हे लक्षात आणून देऊ की याविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घ्यावी. आपापल्या राज्यामध्ये शाळांमध्ये असे दिन साजरे होऊ नयेत यासाठी आक्रमक झालं पाहिजे अशी भूमिका यावेळी शरद पवार यांनी मांडली.

Sharad Pawar
Bajarang Dal: "बजरंग दलावर बंदी घालणार नाही, पण..."; दिग्विजय सिंहांनी स्पष्ट केली भूमिका

बैठकीनंतर १ सप्टेंबरला मुंबई 'इंडिया'ची सभा होणार

३१ ऑगस्टला मुंबईत इंडिया आघाडीची बैठक घेतली जाईल तसेच दुसऱ्या दिवशी १ तारखेला सभा देखील होणार आहे. त्याच्यापुढील काळात मोदी सरकारविरोधात जनमत तयार करणं आणि काय पर्याय देऊ शकतो याचा विचार आम्ही करणार आहोत, अशी माहिती यावेळी शरद पवार यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com