Indigo
IndigoSakal

Indigo: इंडिगोच्या उपमा अन् पोह्यात सोडियमचं प्रमाण? इन्फ्लुअर्सरच्या आरोपावर कंपनीचं स्पष्टीकरण

इंडिगोमध्ये दिल्या जाणाऱ्या उपमा आणि पोह्यांमध्ये सोडियमचे प्रमाण मॅगीपेक्षा जास्त आहे, असे एका सोशल मीडिया इन्फ्लुअर्सरने एक्सवर व्हिडिओ शेअर करत दावा केला आहे.

indigo used poha upma higher sodium claims social media influencer airline clarifies watch video

इंडिगोमध्ये दिल्या जाणाऱ्या उपमा आणि पोह्यांमध्ये सोडियमचे प्रमाण मॅगीपेक्षा जास्त आहे, असे एका सोशल मीडिया इन्फ्लुअर्सरने एक्सवर व्हिडिओ शेअर करत दावा केला आहे. हा व्हिडिओ व्हायर होताच इंडिगो कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे की त्यांच्या प्री-पॅक उत्पादनांमध्ये सोडियमचे प्रमाण निर्धारित नियमांनुसार आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर रेवंत हिमात्सिंका 'फूड फार्मर' नावाच्या यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने सांगितले की, "आपल्यापैकी बहुतेकांना आधीच माहित आहे की मॅगी हे उच्च सोडियमचे अन्न आहे! परंतु आपल्यापैकी बहुतेकांना माहित नाही की इंडिगोच्या मॅजिक उपमामध्ये मॅगीपेक्षा 50 टक्के जास्त सोडियम आहे," इंडिगोच्या पोह्यामध्ये मॅगीपेक्षा 83 टक्के जास्त सोडियम आणि डाळ तांदळात मॅगीइतकेच सोडियम असते. रेवंत हिमात्सिंका यांचे एक्सवर 89.5k फॉलोअर्स आहेत.

Indigo
Food For Digestion: उन्हाळ्यात पचनसंस्था राहील सुरळित, आजच 'हे' 5 पदार्थ खाणे टाळा

या आरोपांनंतर, इंडिगोने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे की, काही प्री-पॅक उत्पादने पारंपारिक भारतीय पाककृतींनुसार तयार केली गेली आहेत आणि त्यात सोडियमचे प्रमाण निर्धारित नियमांनुसार आहे.

इंडिगो केवळ नामांकित विक्रेत्यांद्वारे तयार केलेले ताजे आणि प्री-पॅक केलेले अन्न देते. इंडिगो फ्लाइट्सवर दिल्या जाणाऱ्या सर्व जेवणांमध्ये FSSAI नियमांनुसार घटक आणि पौष्टिक माहिती देखील असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com