International Dance Day: नृत्यकला देते जगण्याचे भान

International Dance Day 2024: मुळात नृत्य हे एक मानवी भावभावना उत्स्फूर्तपणे सादर करण्याचे सशक्त साधन मानल जातं. मग ते शास्त्रीय नृत्य असो वा पाश्चात्य नृत्य असो, योग्य प्रकारे शिक्षण घेऊन त्यातून कलाकार आणि प्रेक्षक अशा दोघांनाही आनंदाची अनुभूती मिळणं हा त्यामागचा मुख्य उद्देश
International Dance Day 2024
International Dance Day 2024Sakal

( लेखिका भरतनाट्यम नृत्यांगना व ध्यासच्या परफॉर्मिंग आर्टसच्या संचालिका आहेत.)

केतकी नेवपुरकर

वारसा म्हणजे फक्त स्थळ नव्हे. तर त्या- त्या भागातील संस्कृती, गायन, नृत्य, खाद्यसंस्कृती, वस्त्र, लिखाण, नोंदी, वाद्य, भाषा, बोली, कला म्हणजे वारसा. वारसा मूर्त व अमूर्त दोन्ही स्वरूपात असतो. वारसा म्हणजे ओळख, त्या-त्या भागातील माणसांची, त्यांच्या राहणीमानाची. वेगवेगळ्या संस्कृतीच्या पाऊलखुणा ''वारसा'' या शब्दात डोकावतात.

आपल्या आजूबाजूने सहजच बघायला गेला तर, असे कितीतरी वारसे दिसतात. वारसा संवर्धनाचे भान पुढच्या पिढीत यायला हवे. तेव्हाच एक पिढी दुसऱ्या पिढीशी कनेक्ट होईल.

त्या कला ही भारताला मिळालेली दैवी देणगीच म्हणायला हवी. भारतीय संस्कृतीत ६४ कलांच महत्व सांगितलं आहे. त्यातलीच एक महत्वाची कला म्हणजे नृत्य कला! शास्त्रीय नृत्य हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग.

मुळात नृत्य हे एक मानवी भावभावना उत्स्फूर्तपणे सादर करण्याचे सशक्त साधन मानल जातं. मग ते शास्त्रीय नृत्य असो वा पाश्चात्य नृत्य असो, योग्य प्रकारे शिक्षण घेऊन त्यातून कलाकार आणि प्रेक्षक अशा दोघांनाही आनंदाची अनुभूती मिळणं हा त्यामागचा मुख्य उद्देश. २९ एप्रिल जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो.

या निमित्त्याने भारतीय नृत्याचा वेध घेतला. शास्त्राचं ज्ञान आणि तंत्राची जोड ज्या नृत्यासाठी अवलंबली जाते ते शास्त्रीय नृत्य. शास्त्रीय नृत्य विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करतात. यातून आपल्याला विविध राज्यांमधला संस्कृतीचा आणि परंपरेचा मिलाफ बघायला मिळतो. प्रामुख्याने नृत्य कला ही स्वानंदासाठी सादर केली जाते. पण पूर्वी देवदेवतांची आराधना करण्यासाठी सुद्धा नृत्यसादरीकरण केले जायचे.

International Dance Day 2024
Aplastic Anemia: ऊठसूट गोळ्या घेऊ नका...अतिसेवनाने होऊ शकतो जीवघेणा ‘अप्लॅस्टिक अ‍ॅनेमिया’

पौराणिक कथा, देवांची स्तुती शास्त्रीय नृत्यातून सादर होत. पूर्वीच्या काळी राजदरबारी नृत्य कलेला राजाश्रय दिला गेला आणि यातूनच पुढे नृत्यकलेची वाढ झाली. भारतीय संस्कृतीत जितकं कलेचं महत्व आहे. तितकंच महत्व गुरु शिष्य परंपरेला आहे. कारण कोणतीही कला आत्मसात करायची असेल तर गुरु पाठीशी असायलाच हवा.

कोणत्याही शास्त्रीय कलेचे ज्ञान किंवा ती कला ग्रहण करायची असेल तर गुरूंचे मार्गदर्शन अत्यावश्यक आहे. कालांतराने शास्त्रीय नृत्याचे संवर्धन करण्याची आणि ती परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी तरुण पिढीने घेतली. तरुण पिढी या कलेमध्ये अनेकविध प्रयोग करत आहे, अतिशय समर्पक रीतीने पौराणिक विषयांसोबतच इतर विविध विषयांवर सुद्धा भाष्य करून, विचारांची वेगळ्या रूपात मांडणी करून ही नृत्य कला लोकांपर्यंत पोचवण्याचा तरुण पिढी प्रामाणिक प्रयत्न करताना दिसतात.

पण काही ठिकाणी, काही प्रमाणात तरुण पिढीची अनेकदा दोलायमान स्थिती होते. त्यांच्यासमोर असा प्रश्न असतो की, अभ्यासाला महत्व द्यावं की कलेला, नृत्याला महत्व द्यावं? पण मला हेच सांगायला आवडेल की, अभ्यास तर महत्वाचा आहेच. पण, कला ही कायमच तुम्हाला कस जगावं हे शिकवते, कला कधीही तुम्हाला एकट पडू देत नाही. त्यामुळे कोणतीही कला जर तुम्हाला आत्मसात करता आली तर ती जरूर शिका. कलेतून आत्मानंदाचा मार्ग नक्कीच शोधायला हवा आणि ती कला पुढच्या पिढीपर्यंत पोचवून स्वतःसाठी, रसिकांसाठी आणि पुढच्या पिढीसाठी आनंदाची रसनिष्पत्ती करायला हवी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com