मानससूत्र : वेळेचं व्यवस्थापन आणि ताण

‘वायटूके’ या शब्दाबद्दल खूप उत्सुकता व कौतुक माझ्या पिढीला (वय वर्षे ४५ ते ६०) होते - कारण तेव्हा वर्षच नाही, तर संपूर्ण शतकच बदलत होते.
Time management and stress
Time management and stresssakal
Summary

‘वायटूके’ या शब्दाबद्दल खूप उत्सुकता व कौतुक माझ्या पिढीला (वय वर्षे ४५ ते ६०) होते - कारण तेव्हा वर्षच नाही, तर संपूर्ण शतकच बदलत होते.

- जयश्री फडणवीस

‘वायटूके’ या शब्दाबद्दल खूप उत्सुकता व कौतुक माझ्या पिढीला (वय वर्षे ४५ ते ६०) होते - कारण तेव्हा वर्षच नाही, तर संपूर्ण शतकच बदलत होते. ‘वायटूके’मध्ये जन्मलेली मुले आज २३ वर्षांची होतील. कुतूहल हेच होते, की या मुलांची आव्हाने काय असतील? सातत्याने विकसित होणारी technology आणि प्रसारमाध्यमे यांचा त्यांच्या वाढी-विकासावर काय परिणाम करेल? काय असेल जगण्याची पद्धत? आहार, विहार, आचारविचार?

मी गेली ३५ वर्षे शिक्षक आणि मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत असल्याने या पिढीचा प्रवास अतिशय जवळून पाहू शकले. मी वय वर्षे १८ ते ३५ या वयोगटातील तरुणांच्या मागोवा घेतला, तर अनेक विषयांतील त्यांचे संघर्ष आणि आव्हाने प्रकर्षाने जाणवली. त्याबद्दल ऊहापोह होणे गरजेचे आहे. कारण आजचा हा युवा भारताचा चेहरा, ताकद आणि भविष्य आहेत.

आजच्या आपल्या तरुण पिढीला सर्वांत मोठे आव्हान जाणवते ते वेळेचे व्यवस्थापन आणि त्यातून निर्माण होणारे ताणतणाव.

सुरवात होते ती जागतिकीकरणातून निर्माण झालेली वेळेच्या व्यवस्थापनाची आव्हाने. मग तो बारावीनंतर SAT देऊन अमेरिकेला जाणारा विद्यार्थी असो, किंवा आयटी कंपन्यांमध्ये नोकरी करणारा तरुण. वेळेची आव्हाने अनेक. उदाहरणार्थ, नवरा अमेरीकन कंपनीत, तर बायको भारतीय किंवा जपानी कंपनीत नोकरी करणारी. ‘work from home’ असले, तरी time zone वेगळे.

आरोग्यावर विपरीत परिणाम तर होतातच; पण मानवी नातेसंबंधदेखील ताणले जाऊ लागतात- कारण एकमेकांचा सहवासही मिळत नाही. मुलंबाळं असणाऱ्या जोडप्यांची तर अजूनच दारुण अवस्था. सहा-सात वर्षांच्या लहानग्याला आई सतत घरात दिसते; पण तिच्याजवळ जाताच ती ओरडते, ‘‘गो अवे. डोंट डिस्टर्ब मी. कांट यू सी आयएम वर्किंग?’’ विचार करा, काय परिणाम होत असतील या लहानग्यावर? गरज आहे ती वेळेच्या व्यवस्थापनाची, नियोजनाची आणि आपल्याला नक्की काय हवंय हे समजून प्राधान्यक्रम देण्याची.

कोणत्या ॲक्टिविटीला किती वेळ (क्रियाशीलतेला) द्यायचा, किती महत्त्व द्यायचे याबाबतचं नियोजन म्हणजे वेळेचे व्यवस्थापन.

वेळेचे व्यवस्थापन केले असता आपल्यातील कार्यक्षमता, परिणामकारकता (एफिशिअन्सी) आणि उत्पादनक्षमतेत (प्रॉडक्टिविटी) सातत्याने उत्तमरित्या वाढ होत असते आणि म्हणूनच आपल्या वेळेचे गुंतवणूक कशात करायची याचे सतत नियोजन केले पाहिजे. प्रत्येक गोष्टीची वेळ असते, तेव्हाच तो घडायला हवी. वेळ निघून जाण्यापूर्वी तिची कमी किंमत कळायला हवी.

(लेखिका समुपदेशक, मानससंशोधक आणि यशविषयक प्रशिक्षक आहेत.)

सेल्फी विथ बेस्टी

तुम्हाला तुमच्या मित्रमंडळींबरोबर सेल्फी काढायला आवडतात ना? मग आम्हाला ते जरूर पाठवा. याच पुरवणीत आम्ही ते प्रसिद्ध करू. त्यात तुमचं नाव, ग्रुपचं किंवा महाविद्यालयाचं नाव आणि मुख्य व्यक्तीचा मोबाईल नंबर या गोष्टी जरूर नमूद करा.

सेल्फी पाठवण्यासाठी ई-मेल : jallosh@esakal.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com