जाणून घ्या, जिऱ्याचे पाणी पिण्याचे काही खास फायदे; समस्या होतील दूर

जीऱ्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि मळमळ दूर होते आणि यामुळे प्रतिकारशक्तीही वाढते.
jeera benefits for health
jeera benefits for health
Summary

जीऱ्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि मळमळ दूर होते आणि यामुळे प्रतिकारशक्तीही वाढते.

जिरे हे खायला थोडे तिखट असले तरी आरोग्यासाठी ते फायद्याचे असतात. यामुळे होणाऱ्या फायद्यांची यादी बरीच मोठी आहे. अनेक भाज्यांमध्ये जीऱ्याचा वापर केला जातो. सर्वात जुन्या मसाल्यांपैकी एक म्हणून जीऱ्याकडे पाहिले जाते. जीरे हे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असून याचे आरोग्याला विशेष फायदे होतात. जीऱ्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि मळमळ दूर होते. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. जिरे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यास सकाळी त्याचे पाणी पिल्याने शरीराला असंख्य फायदे होतात. ते खालीलप्रमाणे...

पोटासाठी जीऱ्याचे पाणी चांगले

आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी जिरे फायदेशीर आहेत. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर तुम्ही जिऱ्याचे पाणी प्यायला तर याचे अनेक फायदे तुम्हाला दिसतील. आपले चयापतय सुधारण्यास मदत करणारे कार्बोहायड्रेट्स, ग्लुकोज हे स्रावित करण्यास मदत करतात.

jeera benefits for health
Eye Color: तुमच्या डोळ्यांच्या रंगामागचं कारण माहितीये ? जाणून घ्या त्यामागचं सायन्स

मधुमेहींसाठी फायदेशीर

मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी जिऱ्याचे पाणी उपयुक्त आहे. अनेकजण जिरे पाण्यात मिसळून रिकाम्या पोटी पितात. जिऱ्याचे पाणी शरीरातील इन्सुलिन उत्पादनास उत्तेजन देते. रक्तातील साखरेची पातळी वाढण्यासाठी जिऱ्याची मदत होते. जिऱ्याचे पाणी प्रभावीपणे आपले शरीर स्वच्छ करते आणि हायड्रेटेड ठेवते.

गर्भधारणेदरम्यान पचन सुधारणे

गर्भधारणेदरम्यान जिऱ्याचे पाणी हा एक सर्वोत्तम उपाय आहे. जिऱ्याचे पाणी शरीरातील गॅसपासून मुक्त करते. याचे काही गुणधर्म गर्भवती महिलांमध्ये ऍसिड रिफ्लक्स सुधारू शकतात. हे पाणी कर्बोदकांमधे आणि चरबीच्या पचनासाठी आवश्यक असते. एन्झाईमसाठी एक उत्तेजक म्हणून हे पाणी काम करू शकते.

प्रतिकारशक्ती वाढवते

जिऱ्यामध्ये पोटॅशियम आणि लोहाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. जिरे हे अँटिऑक्सिडेंट निर्माण करणारे असून त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. हे संक्रमणास कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतात. जिऱ्यामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम अशी अनेक प्रकारची खनिजेही असतात.

jeera benefits for health
Diet Tips : मसल्स बनवायचेत? हा घ्या डाएट प्लॅन

त्वचेसाठी चांगले

जिरे त्वचेसाठी चांगले आहेत. जिर्‍याचे पाणी पिल्याने त्वचेला ग्लो येतो आणि ती आरोग्यदायी, चमकदार दिसते. जिऱ्यामध्ये भरपूर पोटॅशियम, कॅल्शियम, सेलेनियम, कॉपर आणि मॅंगनीज हे निरोगी त्वचेसाठी जबाबदार असतात. जर तुम्ही जिरे पाण्याचा फेस पॅक हळदीसह वापरलात तर ते तुम्हाला चांगले परिणाम दिसतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com