Kartiki Ekadashi 2023 : भारताच्या पहिल्या गावातही आहे विठ्ठल रखुमाईचे मंदिर

बर्फाळ प्रदेशातही वसले आहेत विठु माऊली अन् गणपतीबाप्पा
Kartiki Ekadashi 2023
Kartiki Ekadashi 2023esakal

Kartiki Ekadashi 2023 :

उत्तराखंडमध्ये असलेले माणा गाव आपल्या सांस्कृतिक वारशासाठी तसेच इतर अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. या गावात राडांपा जातीचे लोक राहतात. पूर्वी लोकांना या गावाबद्दल फारच कमी माहिती होती पण नवे रस्ते बनल्यानंतर सर्वांना याची माहिती आहे. या गावाचे एक खास वैशिष्ट्य आहे जे आपल्या महाराष्ट्रासाठी आणि वारकरी सांप्रदायासाठी महत्त्वाचे आहे.

देशाच्या प्रथमस्थानी असलेले हे गाव बद्रिनाथापासून जवळ आहे. त्या भागात भगवान शंकरांची उपासना करणारे भक्त जास्त पहायला मिळतात. या गावात सरस्वती नदीचा उगमही झाला आहे. याच गावात विठ्ठल रुक्मीणीचे मंदिरही आहे.आज कार्तिक वारीनिमित्त या खास मंदिराबद्दल अधिक माहिती घेऊयात.

Kartiki Ekadashi 2023
Kartik Ekadashi : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चळवळीचं साक्षीदार राहिलेलं विठ्ठल-रखुमाई मंदिर सजलं; दर्शनासाठी मोठी गर्दी
सरस्वती नदीचे उगमस्थान
सरस्वती नदीचे उगमस्थानesakal

भारतात अशी अनेक गावे आहेत, ज्यांच्याशी काही पौराणिक रहस्य जोडलेले आहे. हे गावही असेच आहे. चीनच्या सीमेला लागून असलेल्या पवित्र बद्रीनाथपासून चार किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. या गावाचे नाते महाभारत काळाशीही जोडलेले आहे. तसेच,श्रीगणेश आणि विठ्ठल रखूमाईशीही. या गावातूनच पांडव स्वर्गात गेले असे मानले जाते.

माणा नावाचे हे गाव सुमारे 19 हजार फूट उंचीवर आहे. मणिभद्र देव यांच्या नावावरून या गावाचे नाव ‘माणा’ पडल्याचे सांगितले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, हे भारतातील एकमेव गाव आहे, जे पृथ्वीवर असलेल्या चार धामांपैकी सर्वात पवित्र मानले जाते. हे गाव शापमुक्त आणि पापमुक्तही मानले जाते.

माणा गावात कडाक्याची थंडी असते. हा बर्फाच्छादीत भाग असल्याने सहा महिने फक्त बर्फाने झाकलेला असतो. हिवाळा सुरू होण्यापूर्वी येथे राहणारे ग्रामस्थ चमोली जिल्ह्यातील खालच्या गावात स्थायिक होतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की येथील एकमेव इंटर कॉलेज माणा येथे सहा महिने आणि चमोलीत सहा महिने चालवले जाते.

Kartiki Ekadashi 2023
Kartiki Ekadashi 2023 : विठ्ठल नामाची शाळा भरली...! विठ्ठलांची ही नावं तुम्हाला माहिती आहेत का?
विठ्ठल रुक्मिणी मंदिर
विठ्ठल रुक्मिणी मंदिरesakal

हिंदू धर्माचे उगमस्थान असलेल्या बद्रीनाथ धामजवळील माणा गावात सरस्वती नदीच्या काठावर सरस्वतीचे भव्य मंदिर बांधले आहे. या मंदिरात विठ्ठल रखूमाई, संत ज्ञानेश्वर, संत तूकाराम यांच्या रेखीव मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे, पुण्यातील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या संकल्पनेतून या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे.

या गावाच्या आजूबाजूला पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. सरस्वती आणि अलकनंदा नद्यांचा संगमही इथे पाहायला मिळतो. याशिवाय येथे अनेक प्राचीन मंदिरे आणि गुहा आहेत, ज्यांना पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. गावाची उंची समुद्रसपाटीपासून 18,000 फूट आहे, तेथून दऱ्यांचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे.

Kartiki Ekadashi 2023
Pattankadoli Yatra : कैताळांच्या निनादात पट्टणकोडोलीत विठ्ठल-बिरदेव यात्रेला सुरुवात; फरांडेबाबांनी भाकणुकीतून काय दिला इशारा?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com