Kolhapur Flood :  कोल्हापुरात पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली की या मंदिरात पाणी येतं, चमत्कार आहे की आणखी काही

Khol Khandoba Temple : खंडोबाच्या या मंदिराचे आणकी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचा कळस गोल घुमटाच्या आकाराचा आहे.
Kolhapur Flood
Kolhapur Flood esakal
Updated on

Kolhapur Flood :

कोल्हापुरातत महापूर येणार की काय अशी भिती असतानाच वरूण राजाने उसंत घेतली आहे. कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे दोन-तीन दिवस स्थीर असलेली पाण्याची पातळी आता इंचा-इंचाने कमी होत आहे. कोल्हापुर हे प्राचिन शहर आहे. इथे चौकाचौकात मंदिरे आहेत. त्या मंदिरांचा विशिष्ट इतिहासही आहे. 

कोल्हापूर शहरातील शनिवार पेठ भागामध्ये श्री खंडेरायाचे खोल खंडोबा हे प्राचीन देवस्थान आहे. जमिनीपासून खाली 17 फुटावून अधिक खोलीवरती श्री मार्तंड भैरव अर्थात खंडोबाचे स्वयंभू शिवलिंग आहे. (Kolhapur Flood)

Kolhapur Flood
Kolhapur Flood : महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरसाठी तातडीचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला महत्वाचा आदेश

कोल्हापुरात ब्रह्मपुरी, उत्तरेश्वर, खोलखंडोबा, रंकाळा, पद्माळा आणि रावणेश्वर लहान गावे होती. साधारणपणे सतराव्या शतकात मंदिराचे पुजारी मेघश्याम जगताप यांच्या पूर्वजांना दृष्टांत होऊन श्री खंडोबाचे स्वयंभू लिंग दृष्टीस पडले. आज या मंदिरात उतरून जायला जमिनीपासून खाली पायऱ्या आहेत. म्हाळसा खंडोबा यांच्या मूर्ती आहेत.

Kolhapur Flood
Kolhapur Flood Alert: कोल्हापूर-रत्नागिरी मार्गासह जिल्ह्यातील १० राज्यमार्ग पाण्याखाली, अन्य मार्गांवरून वाहतूक सुरू

खोल खंडोबा मंदिरात दरवर्षी पुराच्यावेळी पाणी येते. पुर वाढेल तसे या मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पाणी येते. याचे वैशिष्ट्य असे आहे की, हे मंदिर शनिवार पेठेत आहे. पन्हाळ्याकडून शिवाजी पुलावरून पुढे आलं की शहराकडे येणाऱ्या शनिवार पेठेत हे मंदिर आहे. पंचगंगा नदी आणि हे मंदिरामध्ये साधारण एक किलोमीटरचे अंतर असेल. त्यामुळे दरवर्षी न चुकता या मंदिरात पाणी येते. 

दरवर्षी पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली. की या देवाच्या गाभाऱ्यात पाणी येते, कारण ही या भागातली भूगर्भाची पातळी म्हणता येईल. त्यामुळे पंचगंगेला पूर आल्यानंतर गाभाऱ्यामध्ये पाणी येते, असे इतिहास संशोधक ऍड.प्रसन्न मालेकर यांनी सांगितले.

Kolhapur Flood
Kolhapur Flood : पावसाचा जोर कमी असला, तरी महापुराची स्थिती गंभीरच! पंचगंगेची पाणीपातळी किती फुटांवर?

खोल खंडोबाच्या मंदिराला आहे गोल घुमट

खंडोबाच्या या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचा कळस गोल घुमटाच्या आकाराचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Hippargi Almatti Dam Water Storage Under Scrutiny Growing Flood Threat for Kolhapur and Sangli Districts
Radhanagari Dam 97 percent full update
Almatti Dam latest water storage update
Historic Ballaleshwar Temple in Pali Waterlogged Amid Torrential Rainfall
Marathi News Esakal
www.esakal.com