Kids Care Tips : लहान मुलांना गायीचं दूध जास्त प्रमाणात देऊ नये, कारण...

बाळाला दिवसातून किती प्रमाणात दूध द्यावं?
Kids care tips
Kids care tipsesakal

Kids care tips : आताच्या काळात जन्मलेल्या बाळासाठी केवळ मातेचं दूध सुरक्षित मानलं जातं. नवजात शिशूला सहा महिने होईपर्यंत मातेचे दूध दिले जाते. पण, तुम्हाला माहितीय का, की पुर्वीच्या काळात जन्मलेल्या बाळांना गाईचे दूध दिले जायचे.  

पण, सध्याचे डॉक्टर बाळाला फक्त स्तनपान देण्यास सांगतात. डॉक्टर बाळांना फॉर्म्युला दूध देण्याची शिफारस करतात. फॉर्म्युला मिल्क देखील गायीच्या दुधापासून बनवले जात असले तरी मुलांना पचायला ते हलके असते.

पण, एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना गाईचे दूध का देऊ नये, त्याचे काय तोटे आहेत हे आपण पाहुयात.

Kids care tips
Kids Junk Food Addiction: तुमच्याही मुलाला पिझ्झा-बर्गर खाण्याची सवय लागलीये? मग या टिप्स नक्की ट्राय करून पाहा

डॉक्टर, एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाला गाईचे दूध देण्यास नकार देतात कारण या काळात मुलाची पचनसंस्था नाजूक राहते. अशा स्थितीत गाईचे दूध प्यायल्याने मुलांना पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. गाईच्या दुधात सोडियम, प्रथिने आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. जे मुलासाठी पचणे कठीण असते.

मुलाला जन्मापासूनच्या काही वर्षांपर्यंत लोह, व्हिटॅमिन-ई आणि फॅटी ऍसिडची आवश्यकता असते. जे दुधामध्ये कमी प्रमाणात आढळतात. म्हणून डॉक्टर त्यांच्या वाढीसाठी गायीच्या दुधाची शिफारस करत नाहीत. गाईच्या दुधात लोहाच्या कमतरतेमुळे अनेक वेळा लहान मुलांमध्ये अशक्तपणाची तक्रार असते. (Childrens)

Kids care tips
Nutrition Tips for Kids : वाढत्या तापमानात लहान मुलांना द्या हे ६ आरोग्‍यदायी स्‍नॅक्‍स

आपण गायीचे दूध कधीपासून देऊ शकतो?

वयाचा १ वर्षांचा टप्पा पूर्ण होईपर्यंत बाळाला आईचे आणि म्हैशीचे दूध दिले जाते. त्यानंतर त्याची पचन क्षमता वाढते. गाईचे दूध पचवण्याची क्षमताही बाळामध्ये १ वर्षानंतर येते. त्यामुळे गायीचे दूध एका वर्षानंतर मुलाला दिले जाऊ शकते. या दरम्यान त्याला फुल फॅट दूध दिले जाऊ शकते.

बाळाला दिवसातून किती दूध द्यावं?

बाळ जन्मल्यानंतर तो वर्षभर तरी आईच्या दुधावर अवलंबून असतो. पण, बाळ वरचे पदार्थ खायला लागले की त्याची दूध पिण्याचे प्रमाण कमी होते. तरीही बाळाला दिवसातून केवळ 400 मिली दूध पुरेसे आहे. त्यापेक्षा जास्त दूध देण्याची गरज नाही. बाळ सतत दूधच मागत असेल तर त्याला वेगवेगळ्या पद्धतींनी नवनवे पदार्थ खायला घालावेत.

गाईच्या दुधाचे फायदेही आहेत

  1. बाळाला गायीचे दूध दिल्यास त्याची कॅल्शियमची कमतरता दूर होते. त्यामुळे त्याचे मानसिक आरोग्यही सुधारते.

  2. गाईच्या दुधात असलेले कॅल्शियम मुलांची हाडे मजबूत करते.

  3. गाईच्या दुधात असलेली प्रथिने, फॅट यांसारखे पोषक घटक बालकांच्या विकासासाठी आवश्यक असतात.

मग लहान मुलांना काय द्यावे?

नुकतेच जन्मलेल्या बाळाला आईच्या दुधाची गरज असते. पण सध्या काही कारणास्तव आईला दूध लवकर येत नाही. त्यामुळे डॉक्टर बाळाला फॉर्म्युला मिल्क आणि पाणी देण्यास सांगतात. तसेच ते काही त्यांच्याकडील लिक्वीडही देतात. जेणेकरून बाळाला विकनेस येऊ नये.

बाळाचे वजन जास्त असेल तर अगदी एका तासाला त्याला फिडींग द्यावे लागते. तेव्हा आईला दूध जास्त नसते. तर डॉक्टर आईसाठी शतावरी कल्प देण्यास सांगतात. यामुळे नैसर्गिकरित्या आईच्या दूधात वाढ होते. (Baby Care Tips )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com