Kitchen Hacks : नारळ फोडण्यासाठी मनस्ताप करून घेऊ नका, या ट्रिक्स येतील कामी! | Kitchen Hacks : easiest way to peel coconut how to easily break coconut | how to break coconut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

how to break coconut

Kitchen Hacks : नारळ फोडण्यासाठी मनस्ताप करून घेऊ नका, या ट्रिक्स येतील कामी!

how to break coconut : उन्हाळ्यात नारळाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही त्याचे पाणी आणि फळ दोन्ही वापरू शकता. त्यात सोडियम, पोटॅशियमसह अनेक खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात, जे उन्हाळ्यात तुम्हाला हायड्रेट ठेवण्याचे काम करतात.

एवढेच नाही तर सुक्या खोबऱ्याचा वापर स्वादिष्ट बनवण्यासाठी केला जातो. अशा परिस्थितीत जर तुम्ही बाजारातून ताजे नारळ घरी आणले असेल पण ते कसे फोडायचे हे माहित नसेल तर आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीने नारळ कसा फोडू शकतो हे सांगत आहोत. याचा सर्वात सोपा मार्ग जाणून घेऊया.

फ्रीझर वापरा

जर तुम्हाला सोप्या पद्धतीने नारळ फोडायचा असेल तर एक दिवस आधी नारळाची साल काढून रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवा. सकाळपर्यंत नारळ पूर्णपणे गोठलेला असेल. आता त्यावर सर्व बाजूंनी हातोड्याने हलके मारा. तुमचा नारळ सहज फुटत असल्याचे तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे तुम्ही त्यातील पाणी वेगळे करा आणि खोबरे वेगळे काढा.

ओव्हन वापरा

घरात ठेवलेल्या ओव्हनच्या मदतीने तुम्ही नारळ सहज फोडू शकता. यासाठी प्रथम नारळाची वरची साल व्यवस्थित सोलून घ्यावी. नंतर ओव्हन 40 अंशांवर प्रीहीट करा.

आता नारळ ओव्हनमध्ये एक मिनिट ठेवा आणि थांबा. यानंतर ओव्हनमधून नारळ काळजीपूर्वक बाहेर काढा. थोडं थंड झाल्यावर हातोड्याने सर्व बाजूंनी टॅप करा. नारळ सहज फुटेल.

गॅस स्टोव्ह वापरा

जर तुम्हाला अगदी देसी स्टाईलमध्ये नारळ फोडायचा असेल तर स्वयंपाकघरात असलेल्या गॅस स्टोव्हचा वापर करून तुम्ही काही मिनिटांत तो फोडू शकता. यासाठी प्रथम नारळ सोलून गॅस बर्नरवर ठेवा. गॅस चालू करा आणि 2 मिनिटे शिजू द्या.

काही वेळाने खोबरे फिरवत रहा. आता तुम्ही ते गॅसवरून काढा आणि हलक्या हातांनी जमिनीवर थोपटून घ्या. सर्व नारळ सहज बाहेर येईल. उरलेले खोबरे तुम्ही चाकूच्या मदतीने काढू शकता.

नारळाबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहितीयेत का का?

  • हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला नारळ फोडण्याची परंपरा आहे. असे केल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो.

  • देवी देवतांना श्रीफळ अर्पित केल्यानंतर पुरुषच याला फोडतात. नारळातून निघालेल्या पाण्याने देवांच्या प्रतिमांचे अभिषेक केले जातात.

  • नारळाची प्रकृती गार असते. ताजे नारळ कॅलोरीने भरपूर असतात. यात अनेक पोषक तत्त्व असतात. जे आमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

  • जास्तकरून नारळाला फोडूनच देवी देवतांना वाहण्यात येते. या संबंधात अशी मान्यता आहे की आम्ही नारळ फोडून आपल्यातील वाईट गोष्टींचा आणि अहंकाराचा त्याग करतो.

  • मारुतीच्या प्रतिमेसमोर नारळ आपल्या डोक्यावरून 7 वेळा उतरवून फोडायला पाहिजे. यामुळे वाईट दृष्ट असल्यास त्याचा प्रभाव कमी होतो.

  • नारळ वरून कठोर आणि आतून एकदम नरम आणि गोड असत. आम्हाला आपल्या जीवनात देखील नारळाप्रमाणे बाहेरून कठोर आणि आतून नरम व मधुर स्वभावाचे असायला पाहिजे. नारळ आम्हाला हेच शिकवतो.

महिला नारळ का फोडत नाहीत

नारळामध्ये ब्रह्मा, विष्णु आणि महेश या तिन्ही त्रिमूर्तींचे निवासस्थान मानले जाते. श्रीफळ म्हणजे नारळ हे भगवान शिवकचे सर्वात प्रिय फळ आहे. मान्यतेनुसार, नारळामध्ये तीन डोळे त्रिदेव म्हणून पाहिले जाते.

नारळातील हे तीन डोळे हे शिवाच्या त्रिनेत्राचे रूप देखील मानले जाते. शास्त्रात नारळ फोडणे हे एक प्रकारचे त्यागाचे प्रतीक मानले जाते. नारळ हे बीज रुपात असते त्यामुळे ते एक प्रजनन उत्पादक घटक मानले जाते.

नारळ हे बीजरुपी असल्यामुळे प्रजनन क्षमतेशी जुळलेले आहे. महिला या बीजरुपात बाळाला जन्म देतात. तसंच याचा संबंध देखील नारळाशी आहे. महिला नारळ न फोडण्यामागची हिच धारणा आहे.

एखाद्या महिलेने नारळ फोडला तर त्याचा गर्भाशयावर नकारात्मक परिणाम होतो, असे मानले जाते. त्यामुळेच हिंदू धर्म शास्त्रानुसार स्त्रियांना नारळ फोडण्याचा अधिकार दिलेला नाही. तसंच स्त्रियांनी नारळ फोडणे हे हिंदू शास्त्रांमध्ये अशुभ मानले जाते.

टॅग्स :coconutcoconut tree