Oven-Fried Pickles: ओव्हन मध्ये झटपट लोणचे

लोणचे हा तर सगळ्यांचा जेवणातील आवडता आणि एक चटकदार पदार्थ.
Oven-Fried Pickles
Oven-Fried Picklessakal

ओव्हन मध्ये झटपट लोणचे

लोणचे हा तर सगळ्यांचा जेवणातील आवडता आणि एक चटकदार पदार्थ. जेवणात अधिक चव आणण्याचे काम लोणचे करते.

मात्र, लोणचे पूर्ण मुरल्याशिवाय त्याला चव येत नाही, त्यामुळेच लोणचे तयार करून ते मुरवत ठेवण्याची भारतीय पारंपरिक पद्धती ही जगभर प्रसिद्ध आहे. आणि लोणच्याची बरणी की, ज्यामध्ये लोणचे तयार करून मुरविले जाते. त्याचा आजही वापर होतो. मात्र, हे प्रमाण कमी झाले आहे.

कारण आजच्या धावपळीच्या व इंस्टंट जगात लोणचे मुरत ठेवणे हे शक्य होत नाही. त्यामुळे घरात लोणचे तयार करण्यापेक्षा ते आयते खरेदी करण्याकडे लोकांचा कल दिसून येतो.

अर्थात, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात झटपट लोणचे तयार करण्यासाठी आधुनिक सोयी-साधनेही उपलब्ध झाली आहेत. आणि आता त्यामुळे लोणचे बनवण्यासाठी ते बरेच दिवस मुरवत घालण्याची गरज राहिलेली नाही. कारण, अवघ्या काही मिनिटांतच स्वादिष्ट लोणचे घरच्याघरी बनवता येणे शक्य झाले आहे.

कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड असलेल्या सॅमसंग कंपनीने खास ऑल न्यू ‘पिकल मोड मायक्रोवेव्ह’ (Pickle Mode Microwave) म्हणजे लोणचे बनविणारा मायक्रोवेव्ह सादर केला आहे. की ज्याच्या साह्याने ग्राहक त्यांचे आवडते लोणचे अनेक आठवडे उन्हात वाळवण्याशिवाय किंवा अंधाऱ्या जागेत मुरविण्याशिवाय तयार करू शकतात. काही मिनिटांतच स्वादिष्ट लोणचे घरच्याघरी तयार होऊ शकते.

नवीन पिढी आणि व्यावसायिकांना लक्षात घेऊन डिझाईन केलेला हा नवीन मायक्रोवेव्ह त्याच्या नावीन्यपूर्ण ‘पिकल मोड’सह ग्राहकांना त्यांच्या घरात आरामात बसून वर्षभर आरोग्यदायी पद्धतीने आंबा, हिरवी मिरची, इंडियन गुजबेरी, मुळा, आले, कोबी आणि लिंबू अशी विविध प्रकारची लोणची तयार करून देऊ शकतो.

या पिकल मोडमध्ये मायक्रोवेव्ह मसाला, फोडणी आणि उन्हात वाळलेल्या पाककृती बनवण्याचे फीचर्सदेखील आहेत.

मायक्रोवेव्हमधील ‘स्लिमफ्राय’ या ऑप्शनचा वापर केल्यास पथ्याच्या स्वयंपाकासाठी यात खूप कमी तेल वापरले जाते, तर ‘हॉटब्लास्ट’ हे फीचर अन्न ५० टक्क्यांपर्यंत जलद शिजवते.

याशिवाय या मायक्रोवेव्हमध्ये रोटी तसेच नानदेखील बनवली जाऊ शकते. हा नवीन मायक्रोवेव्ह २८ लिटर क्षमतेचा असून त्याची किंमत २४ हजार ९९० रुपये इतकी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com