esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

पोहे

नाश्ताच्या अस्सल पारंपरिक पदार्थ म्हणजे पोहे.

पोहे बनवताना कच्चे राहतात? या टिप्स फॉलो केल्यास बनवतील परफेक्ट

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

नाश्ताच्या अस्सल पारंपरिक पदार्थ म्हणजे पोहे. पोहे हा एक असा नाश्ता आहे जो खूप लवकर तयार करता येते. ते तयार करण्यासाठी जास्त साहित्य आवश्यक नसतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात जास्त तेल किंवा तिखट नसतो. त्यामुळे ते आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. पण कित्येकदा असे घडते की जेव्हा आपण घरी पोहे बनवतो तेव्हा ते हॉटेलसारखे बनत नाहीत. कधीकधी ते खूप मऊ होतात तर कधीकधी व्यवस्थित भिजलेले नसतात. तर कधीकधी पोहेही कच्चे राहतात, कारण ते कसे बनवायचे याची आयडिया नसते. अशा स्थितीत लोकांना स्वादिष्ट पोहे चाखता येत नाहीत. आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही योग्य पध्दतीने पोहे बनवू शकाल.

मोठे आकाराचे पोहे घ्या...

पोहे बनवण्यासाठी लहान पोह्याऐवजी मोठ्या पोह्यापासून बनवा. आपल्याला ते एका मोठ्या प्लेटमधून चाळणीतून चाळावे लागेल, जेणेकरून त्यातील लहान पोहे बाहेर येतील आणि आता फक्त मोठे पोहे शिल्लक राहतील.

हेही वाचा: कांदे-पोहे आणि खमंग चर्चा…

पोहे धुताना लक्षात ठेवा...

पोहे अत्यंत काळजीपूर्वक धुवावे लागतात. पोहे एका भांड्यात 1 ते 2 वेळा धुवा. लक्षात ठेवा की पोहे धुताना तुम्हाला हलके हात वापरुन पोहे पटकन धुवावे लागतील. तांदूळाप्रमाणे जास्त वेळ स्वच्छ करायचे नाहीत. पोहे धुवून झाल्यावर, ते पोहे फुलवण्यासाठी तुम्हाला खूप कमी पाणी वापरावे लागेल. त्यासाठी जास्त पाणी वापरू नका. साधारण २-३ मिनिटांनंतर तुम्हाला या पाण्याने पोहे गाळून घ्यावे लागतात.

पोहे स्टीमवर बनवा...

जर तुम्हाला चविष्ट पोहे बनवायचे असतील, तर यावेळी पोह्यात मीठ, हळद आणि साखर घालावी आणि चमच्याने मिक्स करा. हे पोहे वाफेपासून बनवले जाते. पाणी फक्त 1 कप घ्या. येथे लक्षात घ्या की ज्या पातेल्यात तुम्ही पाणी गरम केले आहे त्यात तुम्हाला पोहे चाळणीच्या भांड्यात ठेवावे लागतील. यासाठी तुम्ही प्लेट किंवा स्टँडची मदत घेऊ शकता. फक्त पाणी खालून पोह्याला स्पर्श करू नये.

हेही वाचा: पोहे इडली बनवणे सोपे, बनवा घरी

पोह्यासाठी खास तडका...

साधारण 4-5 मिनिटे वाफ लावल्यानंतर गॅस बंद करा आणि पोहे उतरवा. आता तुम्हाला पोहे बनवायचे आहेत. एका भांड्यात तेल घ्या. त्यानंतर मोहरी घाला. नंतर कांदा घालून थोडे परतून घ्या. नंतर बडीशेप आणि कढीपत्ता घाला. त्यानंतर हिरव्या मिरच्या घाला. नंतर मीठ आणि हळद घाला. हे दोन घटक कमी प्रमाणात घालावे लागतात. आता पोहे घालून मिक्स करावे. तुम्ही त्यात लिंबाचा रसही घालू शकता.

हे लक्षात ठेवा...

गॅस बंद केल्यानंतर पोहे गॅसवर १०-१५ मिनिटे झाकून ठेवा.

हे काम शेवटी करा...

तुम्हाला मसाल्यांची खूप काळजी घ्यावी लागेल. तुम्ही चाट मसाला, मीठ, लाल तिखट, भाजलेले जिरे मिक्स करून पोह्यावर घाला. नंतर शेंगदाणे घाला. चिरलेला कांदा आणि टोमॅटो पोह्याची चव वाढवतात. थोडी कोथिंबीर आणि डाळिंब देखील टेस्ट वाढवण्यासाठी काम करतात. अशाप्रकारे पोहे तयार आहेत.

loading image
go to top