'ही' काळजी घेतली तर कधीच निघणार नाही नॉन स्टीक भांड्याचं कोटिंग

नॉन स्टीक भांड्यांचं कोटिंग निघतंय?; स्वच्छ करताना घ्या काळजी
'ही' काळजी घेतली तर कधीच निघणार नाही नॉन स्टीक भांड्याचं कोटिंग

एकेकाळी स्वयंपाक घरातील तांब्या-पितळ्याची भांडी म्हणजे त्या घराचं वैभव असल्याचं म्हटलं जायचं. परंतु, कालानुरुप स्वयंपाक घराचं रुपडं पालटलं आणि या तांब्या-पितळ्यांच्या भांड्यांची जागा नॉन स्टीक भांड्यांनी घेतली. आज प्रत्येक गृहिणी नॉन स्टीक भांड्यांनाच पहिली पसंती देतात. या भांड्यांमध्ये कमी तेलात पदार्थ तयार होत असल्यामुळे त्यांचा वापर जास्त केला जातो. मात्र, ही भांडी वापरताना प्रचंड काळजी घ्यावी लागते. अनेकदा ही भांडी तारेने किंवा ब्रशने घासल्यावर त्याच्यावरील कोटिंग निघून जातं. म्हणूनच, नॉन स्टीक भांडी कशा प्रकारे हाताळावीत आणि कशा पद्धतीने स्वच्छ करावीत ते पाहुयात. (kitchen hacks tips tricks non stick tawa pan kadai cleaning home tips)

१. डिश वॉशिंग लिक्विड -

नॉन स्टीक पॅन किंवा कढई स्वच्छ करण्यासाठी डिश वॉशिंग लिक्विडचा वापर करावा. तसंच ही भांडी स्पंजच्या सहाय्यानेच घासावीत. भांडी घासताना कधीही त्यावर जोर देऊ नये. तसंच ही भांडी इतर भांड्यांमध्ये टाकू नयेत. अनेकदा भांडी वर खाली करताना त्यावर ओरखडे येण्याची शक्यता असते.

२. ब्लिचिंग पावडर -

नॉन स्टीक भांडी स्वच्छ करण्यासाठी ब्लिचिंग पावडरचाही वापर करता येऊ शकतो. यासाठी ब्लिचिंग पावडर गरम पाण्यात मिक्स करुन त्या पाण्याने भांडी घासावीत.

३. अॅल्युमिनिअम फॉइल -

नॉन स्टीकची भांडी स्वच्छ करण्यासाठी अॅल्युमिनिअम फॉइलदेखील बेस्ट ऑप्शन आहे. यासाठी अॅल्युमिनिअम फॉइलचा गोळा तयार करुन त्यावर साबण घेऊन त्याने भांडी घासा. मात्र, स्पेशन कोटिंग असलेली भांडी याने घासू नका.

४. बेकिंग सोडा -

नॉन स्टीक पॅनवर एखादा डाग पडला असेल तर त्यावर बेकिंग सोडा, मीठ आणि व्हिनेगर यांची पेस्ट लावावी आणि हलक्या हाताने घासावा.

५. व्हिनेगर -

मंद आचेवर नॉन स्टीक भांडं ठेऊन त्यात पाणी आणि व्हिनेगर समप्रमाणात घेऊन टाका. त्यानंतर एक उकळी आल्यावर त्यात डिटर्जेंट पावडर टाका आणि गॅस बंद करा. पाणी किंचित गार झाल्यावर घासणीने भांडं घासून घ्या.

नॉन स्टीक भांडी स्वच्छ करताना घ्या 'ही' काळजी

१.कधीही कडक किंवा तारेने ही भांडी घासू नयेत.

२. नॉन स्टीक भांडी कायम मंद आचेवर ठेवावीत.

३. शक्यतो स्वयंपाक करताना लाकडी चमचे वापरावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com