
Kitchen Tips: किचन मधील 'ही' पाच स्मार्ट उपकरणे जी कमी जागेत बसतात आणि तुमचे काम सोपे करतात.
आपल्यापैकी अनेकजणांच्या घरातील स्वयंपाकघर हे अगदी लहान असतं. त्यासाठी मग आपल्याला कमी जागेत बसतील असे काही स्मार्ट उपाय शोधावे लागतात. किचनमध्ये जागा कमी असल्याने महिला त्यांचे ड्रॉवर, स्टोरेज अगदी स्मार्टपणे सेट करतात, त्यामुळे तुमचे रोजचे कामे करणेही सहज सोपे होतात. जर तुमचं स्वयंपाकघर लहान असेल तर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात कोणती महत्त्वाची आणि स्मार्ट उपकरणे ठेवावीत ? याच प्रश्नाच उत्तर देणारा हा लेख आहे.या लेखात आम्ही तुम्हाला काही स्मार्ट उपकरणांची सविस्तर माहिती देणार आहे. हे उपकरणे कमी जागेत बसतात आणि तुमचे दैनंदिन कामही सोपे करतात.
1) स्नॅक मेकर:
विशेषत: घरातील लहान मुलांसाठी आपल्या दररोज काही स्नॅक पदार्थ बनवावे लागतात. यामध्ये अनेक महिलांचा भरपूर वेळ जातो. मात्र, हे काम जर उपकरणाने केले तर विचार करा तुमचा किती वेळ वाचेल? या उपकरणात तुम्ही तुमचे हात घाण न करता स्नॅक्सचे मिश्रण बनवू शकता. स्नॅक्स बनवण्यासाठी या मिनी मेकरमध्ये ठेवा. हे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेस शेप मध्ये देखील मिळतात, ज्यामुळे तुम्ही तुम्हाला हवा असलेला कोणताही स्नॅक बनवू शकता. हे उपकरण वापरण्यासाठी अगदी सरळ सोपे आहे कारण त्यात स्नॅकसाठी पीठ टाकून ते हळूहळू हलत राहते.आपण या स्नॅक मेकर नमकीन, चकली, शेव, फरसाण देखील तयार करू शकतो.
2) इन्स्टंट पॉट:
हा पॉट प्रेशर कुकरसारखाच असतो. अलिकडे गृहिणीमध्ये हा पॉट चांगलाच लोकप्रिय झाला आहे. प्रेशर कुकरप्रमाणे, इन्स्टंट पॉट ओलावा सील करतो आणि तापमान वाढल्यावर वाफेत रुपांतर करतो. हा पॉट पाणी कमी वापरतो आणि या पॉटला वीज कमी लागते . या पॉटमध्ये तुम्ही डाळी ,भात ,खिचडी तसेच भाज्या तयार करू शकता. त्यामुळे तुम्हाला तुमच्या किचनमध्ये 3 ते 4 कुकर आणि पॅन ठेवण्याऐवजी इन्स्टंट पॉट ठेवून स्वयंपाकघर स्मार्ट बनवता येईल.
3) हँड ब्लेंडर
एखाद्या पदार्थाची प्युरी किंवा मिश्रण करण्यापूर्वी आपल्याला ते थंड होण्याची वाट पाहावी लागते, त्यामध्येही महिलेचा खूप वेळ जातो. हा वेळ वाचवण्यासाठी तुम्ही आजच तुमच्या घरी हे हँड ब्लेंडर आणा. जर तुम्ही कढईत किंवा इतर कोणत्याही भांड्यात ग्रेव्ही बनवत असाल तर तुम्ही त्यात ब्लेंडिंग करू शकता. हे जड ब्लेंडरसारखे खूप अवजड नाही त्यामुळे ते आवाजही करत नाही. हे पोर्टेबल आहे त्यामुळे तुम्ही ते सहजपणे हाताळू शकता.
4) फूड प्रोसेसर - फूड प्रोसेसर गृहिणीचे खूप काम हलके करू शकते. त्यात भाज्या चिरणे, मिश्रण करणे, कांदा बटाटा याचे काप करणे, मसाला दळणे, प्युरी करणे, फेटणे अशा अनेक गोष्टी तुम्ही सहजपणे करू शकता. तुमचे स्वयंपाकघर स्मार्ट बनवण्यासाठी हे एक चांगले उपकरण आहे. तुम्हाला माहिती का? पोळीचे पीठ देखील तुम्ही या फूड प्रोसेसरमध्ये भिजवून घेऊ शकता. यामुळे तुमचा बराच वेळ वाचतो ज्यामुळे तुम्ही लवकर स्वयंपाक बनवू शकता. यासाठी फक्त चांगला आणि उच्च व्होल्टेज फूड प्रोसेसर घ्यावा. तसेच तुमच्या प्रोसेसरचे ब्लेड हे अदलाबदल करण्यायोग्य असावेत.
5) मायक्रोवेव्ह - अन्न पदार्थ गरम करण्यासाठी आपल्याला 4 पॅन काढून गॅसवर गरम करावे लागत असतील ना? विचार करा जर तुमच्याकडे चांगला मायक्रोवेव्ह असेल तर तुमचा भांडी धुण्याच्या त्रास किती वाचेल. एकाच प्लेटमध्ये अनेक गोष्टी ठेवून तुम्ही ते ओव्हनमध्ये गरम करू शकता. यामुळे तुमचा बराच वेळ वाचेल आणि ते वापरण्यासही अतिशय सोयीचे आहे. मायक्रोवेव्ह (मायक्रोवेव्ह हॅक) मध्ये देखील अन्न पदार्थ जळत नाही.तुम्ही हे पाच उपकरणे खरेदी करुन तुमचं किचन स्मार्ट करु शकता.हे असे केल्याने दोन फायदे होतील झटपट स्वयंपाक होईल आणि तुमचा वेळ वाचेल.