Kitchen Tricks: 'या' ट्रिकमुळे तुमचे किचनमधील किंचकट कामे सोपे होतील.

आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकघरातील अशा काही गोष्टी सांगणार आहेत, ज्याचा उपयोग करुन तुम्ही किचनमधील किंचकट कामे सोपे करु शकतात.
kitchen
kitchenesakal

Kitchen Tricks: चवदार चविष्ट पदार्थ बनवणे ही पाककला आहे आणि प्रत्येकाला ती जमतेच असे नाही.

जर तुम्हालाही स्वयंपाक आणि स्वयंपाकघरात अधिक रुची असेल, तर तुम्ही स्वयंपाकघरात काम करतांना या भन्नाट युक्त्या कशा वापरायच्या याविषयी माहिती जाणून घ्यावी.

आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकघरातील अशा काही गोष्टी सांगणार आहेत ज्या उपयोग करुन तुम्ही किंचकट कामे सोपे करु शकतात.

तांब्याचे भांडे कसे चमकवावे?

जर का तुमच्या घरात तांब्याचे भांडे असेल आणि बराच वेळ वापरल्याने ते काळे दिसायला लागले असेल तर तुम्ही या युक्तीने ते चकाचक करुन चमकवू शकता. तांब्याची भांडी चमकवायची असतील तर सर्वप्रथम कापडावर थोडे टोमॅटो सॉस टाका. यानंतर ते भांडे टोमॅटो सॉस टाकलेले कापडाने चांगले घासून घ्यावे नंतर ते तांब्याचे भांडे दुसऱ्या स्वच्छ कपड्याने पुसून काही वेळ बाजुला ठेवावे, असे केल्याने तुमच्या घरातील पितळचे भांडे चमचम चमकतील.

kitchen
Kitchen Tips: किचन मधील 'ही' पाच स्मार्ट उपकरणे जी कमी जागेत बसतात आणि तुमचे काम सोपे करतात.

दूध किंवा चहा उकळताना ही युक्ती वापरूनच बघा.

कधी कधी आपण दूध किंवा चहा उकळत असतो आणि आपले थोडे लक्ष नसलं की लगेच दूध किंवा चहा उकळते आणि भांड्यातून बाहेर पडते. अशा वेळी ते भांड्यातून दूध बाहेर येण्यापासून थांबवायचे असेल, तर ज्या भांड्यात दूध उकळले जात असेल त्यावर लाकडी चमचा ठेवावा. चमचा बरोबर मधोमध राहिल अशा प्रकारे ठेवा. असे केल्याने तुमचे दूध किंवा चहा उकळेल पण भांड्यातून बाहेर येणार नाही.

भांड्याला चिकटलेले अन्न कसे काढावे?

स्वयंपाक करताना बर्‍याच वेळेला भांड्याला अन्न चिकटते आणि नंतर ते भांडी स्वच्छ करताना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तुम्हाला ही मेहनत टाळायची असेल तर भांड्याला अन्न कुठेही चिकटलेले असेल तर त्यावर बटर किंवा तेलावर आधारित कुकिंग स्प्रे लावा. याने तुमची भांडीही स्वच्छ होतील आणि जास्त मेहनत घेण्याची गरज भासणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com