
उन्हाळ्यात घरी बनवा टेस्टी मँगो आईस्क्रीम; जाणून घ्या सोपी रेसिपी
उन्हाळा आला की आंबा हा सर्वांच्याच आहारातला आवाडता महत्त्वाचा भाग असतो.सोबतच उन्हाळ्यात आईसस्क्रीम खायलाही सर्वांना आवडते. जर आंब्यापासून आईसस्क्रीम खायला मिळाली तर अगदी मेजवाणीच होणार. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मँगो आईस्क्रीम बनवण्याची अगदी सोपी रेसिपी सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही घरी सहज घरी मँगो आईस्क्रीम बनवू शकता.
साहित्य :
1 कप दूध
3 कप क्रीम
१ वाटी आंबा, प्युरी
१ कप आंबा, तुकडे करा
1 टेबल स्पून कस्टर्ड पावडर
1 टेबल स्पून व्हॅनिला
1 कप साखर
कृती -
१. मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी आधी एक चतुर्थांश कप दुधात कस्टर्ड मिसळा आणि बाजूला ठेवा.
२. उरलेले दूध आणि साखर एकत्र गरम करा. साखर पूर्णपणे विरघळू द्या आणि एक उकळी आणा
३.उकळायला लागल्यावर त्यात कस्टर्डचे मिश्रण टाका आणि पुन्हा उकळू द्या.मंद आचेवर एक मिनिट शिजवा, गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या.
४. त्यात आंब्याची प्युरी, आंब्याचे तुकडे, क्रीम आणि व्हॅनिला घाला. ते चांगले मिसळा आणि घट्ट झाकण असलेल्या कंटेनरमध्ये घाला.
५. पूर्णपणे सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा,बाहेर काढा आणि हँड बीटरच्या मदतीने फेटून परत फ्रीजमध्ये ठेवा
Web Title: Know About Mango Ice Cream Check Here Recipe
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..