शाकाहारी कंडोम म्हणजे काय? बाजारात का वाढली मागणी?

know all about vegetarian condom
know all about vegetarian condom
Updated on

पुणे : लोक जोडीदाराबरोबर शारीरिक संबंध ठेवताना नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोमचा वापर करतात. बरीच फ्लेव्हर्ड आणि डॉटेड कंडोम बाजारात मिळतात. शाकाहारी कंडोम हे नाव तुम्ही कदाचितच ऐकले असेल. परंतु बाजारात शाकाहारी कंडोमही उपलब्ध आहेत. आता शाकाहारी कंडोम म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल.

शाकाहारी कंडोम म्हणजे काय?
बीबीसीच्या संकेतस्थळानुसार, पूर्वी मेंढीचे आतडे कंडोम तयार करण्यासाठी वापरले जात असत. पण त्यानंतर, प्राण्यांमध्ये आढळणारे प्रथिने 'केसिन' कंडोम तयार करण्यासाठी वापरण्यास सुरवात झाली. वास्तविक, प्राणी प्रोटीन केसिनचा वापर कंडोमपासून तयार केलेला रबर सौम्य करण्यासाठी केला जातो. परंतु शाकाहारी आणि पर्यावरणपूरक लोकांना या कंडोमचा वापर टाळायचा असल्यामुळे बाजारात शाकाहारी कंडोमची मागणी वाढली. फिलिप सीफर आणि वाल्डेमार झेलर यांनी शाकाहारी कंडोम तयार केले आहे. त्याच्या कंपनीचे नाव आयनहॉर्न आहे. या कंडोमची खास गोष्ट अशी आहे की ते इतर कंडोमप्रमाणे एनिमल प्रोटीन 'केसिन' पासून बनविलेले नसतात. फिलिप सिफर आणि वाल्डेमार झेलर यांनी शाकाहारी कंडोम तयार करण्यासाठी झाडांपासून मिळणाऱ्या नैसर्गिक वंगण वापरली आहे. कंडोम मऊ करण्यासाठी या गुळगुळीतपणाचा वापर केला जातो.

आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

आयनहॉर्न कंपनीने गेल्या 30 वर्षांत शाकाहारी कंडोम तयार करण्यासाठी थायलंडमधील लहान शेतकर्‍यांना सोबत घेत मोठ्या प्रमाणात रबराची झाडे लावली आहेत. या बागांमध्ये कीटकनाशके वापरली जात नाहीत. कंडोम तयार करण्यासाठी हे रबर वापरण्यात येत असल्याने येथिल शेतकऱ्यांनाही चांगले दिवस आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com