तुमच्या किशोरवयीन मुली वॅक्सिंग आणि थ्रेडींगसाठी हट्ट करतात का? जाणून घ्या त्यासाठीचं योग्य वय कोणतं 

टीम ई सकाळ 
Thursday, 4 March 2021

हा विषय सर्वच मातांसाठी एक चिंतेचं कारण ठरतो. मते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या मुलींनी नक्की कोणत्या वयापासून हे सर्व प्रकार करणं फायदेशीर ठरेल. 

नागपूर : आजकालच्या काळात प्रत्येकजण आपल्या लूक्सबद्दल आपला दिसण्याबद्दल आणि राहणीमानाबद्दल अतिशय सजग आहे. विशेष करून किशोरवयीन मुलांमध्ये याचं अधिक प्रमाण बघितल्या गेलं आहे. तसंच आजकालच्या किशोरवयीन मुली वॅक्सिंग, थ्रेडींग आणि प्लकिंगच्या बाबतीत सजग असतात. त्यांना कमी वयापासूनच या सर्व गोष्टी करून घयायच्या असतात. यामुळे हा विषय सर्वच मातांसाठी एक चिंतेचं कारण ठरतो. मते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या मुलींनी नक्की कोणत्या वयापासून हे सर्व प्रकार करणं फायदेशीर ठरेल. 

हेही वाचा - लाफिंग बुद्धांना का मानले जाते गुड लक? काय आहे हास्या मागचे रहस्य?

सर्वात आधी तुमच्या मुलींना कारण विचारा

अनेकदा किशोरवयीन मुली वॅक्सिंग करण्यासाठी आग्रह करत असतात. त्यांना कारण विचारताच "आमच्या वयाच्या सर्वच मुली असं करतात" असं त्या सांगतात. मात्र हे काही पटण्यासारखं कारण नाही. आपल्या वर्गमैत्रीणींशी आपली तुलना करणे ही गोष्ट चांगली नाही.  त्यामुळे तुमच्या मुलींना असं न करण्यास सांगा. तुमच्या मुलींना जवळ बसवून त्यांना कोणाशीही तुलना न करण्यास सांगा. मात्र काही प्रकृतीसंबंधी कारणांमुळे हेयर ग्रोथ जास्त असेल तर १३ ते १६ वर्षाच्या वयापासून तुम्ही मुलींना थ्रेडींग, वॅक्सिंग आणि आयब्रो करायला परवानगी देऊ शकता. 

शेविंग, डेपिलेटरी क्रीम्स, एपिलेटर्स असे काही उपाय वॅक्सिंगपेक्षा जास्त सोपे आणि सहज आहेत. जर तुम्ही मुलींना हेयर रिमूव्हलची परवानगी दिली आहे तर वरील उपाय करून बघा. जर तुमच्या मुलींची त्वचा अतिशय सेन्सिटिव्ह असेल तर त्यांना वॅक्सिंग करताना त्रास होऊ शकतो तसंच त्यांना त्वचेसंबंधी त्रास होऊ शकतो.

हेही वाचा - मन मोहून घेणाऱ्या सुंदर फुलांचे औषधी गुणधर्मही विशेष! जाणून घ्या

मात्र हे सर्व करण्यासाठी तुमचे आई म्हणून तुमच्या मुलीसोबत संबंध चांगले असणं अतिशय आवश्यक आहे. आई म्हणून त्यांना प्रेमानं समजवण्यचं काम तुमचं आहे. 

संपादन आणि संकलन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know what is perfect age of vaxing for teenagers