लाफिंग बुद्धांना का मानले जाते गुड लक? काय आहे हास्या मागचे रहस्य?

Lets find out why Laughing Buddhas are considered good luck.jpg
Lets find out why Laughing Buddhas are considered good luck.jpg

पुणे : जीवनात सुख, समृद्धी, शांतता नांदावी, यासाठी अनेक घरात काही विशिष्ट वस्तू ठेवलेल्या आपण पाहतोच. लाफिंग बुद्ध यांची मूर्ती अनेक लोकांच्या घरी आणि कार्यालयात ठेवली जाते. ही मुर्ती 'गुड लक' किंवा 'लकी चार्म' म्हणूनओळखली जाते. बरेच लोक ही मूर्ती गिफ्ट म्हणूनही देतात. चला तर मग लाफिंग बुद्ध कोण होते आणि त्याची मुर्ती इतकी शुभ का मानली जाते?  ते जाणून घेऊयात. 

महात्मा बुद्धाचे बरेच शिष्य होते. त्यापैकी एक जपानमधील होटेई होते. असे म्हणतात की होटेईंना ज्ञान प्राप्त झाले तेव्हा तो मोठ्याने हसण्यास लागला. तेव्हापासून लोकांना हसू यावे म्हणून त्याने आपल्या आयुष्याचा एकमेव हेतू बनविला. होटेचे शरीर गोलमटोल असून पोट फुगलेले. जेव्हा जेव्हा तो लोकांमध्ये असतो तेव्हा त्याचे मोठे पोट दाखवून तो मोठ्याने हसून वातावरण आनंदित करीत असे. त्याच्या प्रसन्न स्वभावामुळे लोक त्यांना लाफिंग बुद्ध म्हणू लागले. या कारणास्तव, जपान आणि चीनमधील लोकांनी त्याला लाफिंग बुद्ध असे म्हटले आहे. इतर बौद्ध गुरूंप्रमाणे लाफिंग बुद्धाच्या अनुयायांनीही त्यांचा एकमेव उद्देश जगात पसरविला.

होटेईच्या अनुयायांनी त्याचा अशा प्रकारे प्रचार केला की चीन आणि जपानमधील लोकांनी त्याला देव मानू लागले आणि त्याची मुर्ती घरात ठेवू लागले. चीनमध्ये होटेई यांना 'पुतई' म्हणून ओळखले जाते आणि त्यांना फेंगशुईचा देव मानले जाते. असे मानले जाते की ज्या घरात लाफिंग बुद्धाचा मुर्ती आहे तेथे सुख, समृद्धी आणि आनंद राहते आणि घर, ऑफिसमधील नकारात्मकता निघून जाते.

लाफिंग बुद्धाचे असे बरेच प्रकार आहेत. काही हात उंचावलेले, काही एका अंगावर झोपलेले, काही बसलेले. त्या मूर्तीची स्थिती काहीही असो, घरात लाफिंग बुद्ध ठेवणे शुभ मानले जाते. परंतु असे म्हणतात की, हसत असलेले बुद्धांना घरात ठेवणे अधिक शुभ मानले जाते. 

फेंगशुईच्या म्हणण्यानुसार, लाफिंग बुद्ध खरेदी करून घरी आणणे इतकं शुभ मानलं जात नाही जितक ती मूर्ती भेटवस्तू म्हणून मिळाली तर शुभ मानली जाते. बर्‍याचदा असे दिसून येते की लोक लाफिंग बुद्धांना भेट म्हणून देतात. जर लाफिंग बुद्ध योग्य दिशेने ठेवले गेले तर ते आपल्या आयुष्यात खूप आनंद आणतील. पूर्व दिशेला ही मूर्ती ठेवली तर घरामध्ये सुखाबरोबर कुटुंबाचे प्रेमही वाढते. नोकरी-व्यवसायात फायदा होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com