
ऑगस्ट महिन्यापासून भारतात सणांची रेलचेल सुरू होते. म्हणजे रक्षाबंधन, 15 ऑगस्ट पासून ते गणपती, दिवाळी म्हणजे डिसेंबर पर्यंत हा सणांचा माहोल सुरूच असतो. या दरम्यान Amazon आणि Flipkart, Myntra अशा वेगवेगळ्या ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर सेल आयोजित केले जातात. या सेलमध्ये शॉपिंग करताना खूप सारे ऑफर, डिस्काउंट, कूपन, कॅशबॅक तसेच फ्री गिफ्ट दिले जातात.
अनेक जण या सेलमध्ये नवीन प्रोडक्ट खरेदी करतात. पण खरेदी केल्यानंतर त्यांना समजतं की, अरे आपल्याला तर वस्तू महाग लागली. मग तिथून पुढे आपण प्रण करतो की आता ऑफलाईनचं शॉपिंग करू. मग एखाद्या मॉलमध्ये गेल्यावर वाटतं अरे हे पण किती महाग आहे.
मग नक्की जायचं कुठं बाजारात का वेबसाईटवर? अजिबात टेन्शन घेऊ नका. मस्त कॉफी नाहीतर चहाचा घोट घेत घेत हे आर्टिकल वाचून संपवा. कारण तुमच्या या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथंच मिळतील.
तर आधी ऑनलाइन काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही हे समजलं की अर्ध्या गोष्टी तर इथंच क्लिअर होऊन जातात. इथं उदाहरण म्हणून आपण वस्तू घेऊ. यात पहिल्या नंबरवर आहे इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स..
बऱ्याचदा ऑनलाईन वेबसाईटवर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सवर ऑफर्स सुरू असतात. त्यामुळे लोकांचा ऑफलाईनच्या तुलनेत ऑनलाइनकडे ओढा जास्त असतो. जेव्हा केव्हा तुम्हाला एखादं इलेक्ट्रॉनिक गॅझेट खरेदी करायचं असेल तेव्हा ऑनलाइन आणि ऑफलाईनची तुलना करावी आणि मगच वस्तूची खरेदी करावी.
कपडे आणि अॅक्सेसरीज
तुम्ही कोणत्या ब्रॅण्डचे कपडे घालता यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. पण बऱ्याचदा ब्रँडेड कपडे हे ऑफलाईनच्या तुलनेत ऑनलाईन स्वस्त मिळतात. मात्र तुम्ही लोकल प्रॉडक्ट वापरत असाल तर मात्र कपडे असतील किंवा अॅक्सेसरीज, तुम्हाला ते लोकल मार्केट मध्येच स्वस्त मिळतील.
होम फर्निशिंग आणि सजावट
घराबद्दल बोलायचं झालंच तर तुम्हाला घराच्या सजावटीच्या सर्व वस्तू ऑफलाईन मार्केटमध्येच स्वस्तात मिळतील. पण एखादा सण-उत्सव असेल तर तुम्हाला ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सुद्धा डिस्काऊंट मिळेल.
किराणा
जर तुम्ही मेट्रो सिटी मध्ये राहत असाल तर तुम्ही ऑनलाइन किराणा सामान देखील खरेदी करू शकता. ऑनलाइन किराणा माल नेहमीच ऑफलाइनपेक्षा स्वस्त असतो.
खेळणी
लहान मुलांच्या खेळण्यांबद्दल बोलायचं झालं तर अनेकदा खेळणी ऑनलाइन खरेदी करणं ऑफलाइनपेक्षा महाग पडतं.
ब्युटी प्रॉडक्ट
ब्युटी प्रॉडक्टसाठी नायका हा मोठा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आहे. इथं ब्युटी प्रॉडक्टवर नेहमीच डिस्काऊंट सुरू असतं. कधीकधी कूपनही मिळतात. ऑफलाईन ब्युटी प्रॉडक्ट खरेदी करायला गेल्यास ते ओरिजिनल ब्रॅण्डचेच मिळतील असं नाही. तिथे कॉपी प्रॉडक्ट देऊन फसवणूक होण्याची शक्यताही जास्त असते. सोबतच हे प्रॉडक्ट पण खूप महाग असतात. त्यामुळे ब्युटी प्रॉडक्टची ऑनलाइन शॉपिंग करणं कधीही सोयीचं पडतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.