Lakme Fashion Week 2024 : मलायकापासून ते सारापर्यंत अभिनेत्रींचा लॅक्मे फॅशन वीकमध्ये कसा होता लूक?

Lakme Fashion Week 2024 : लॅक्मे फॅशन वीकमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींनी रॅम्प वॉक केला आहे. या रॅम्प वॉकमध्ये सारापासून ते मलायकापर्यंत अनेक अभिनेत्रींचे लूक्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
Lakme Fashion Week 2024
Lakme Fashion Week 2024esakal

Lakme Fashion Week 2024 : बॉलिवूड आणि फॅशन इंडस्ट्रीचे एकमेकांशी अनोखे नाते आहे. स्टायलिश फॅशन, अभिनय आणि अभिनेत्रींचे लूक्स यामुळे फॅशन विश्वात आणि बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींची चर्चा असते. स्टाईलच्या बाबतीत तर कोणतीही अभिनेत्री इतरांपेक्षा काही कमी नाही. नुकत्याच पार पडलेल्या लॅक्मे फॅशन वीक २०२४ मध्ये अनेक अभिनेत्रींनी हजेरी लावली होती.

लॅक्मे फॅशन वीकमध्ये अनेक नामांकित डिझायनर्स त्यांचे नवीन फॅशन कलेक्शन लाँच करतात. या लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक छोटे-मोठे कलाकर, अभिनेते आणि अभिनेत्री उत्सुक असतात. लॅक्मे फॅशन वीकमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींनी रॅम्प वॉक केला आहे. या रॅम्प वॉकमधील अभिनेत्रींचे लूक्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. चला तर मग नजर टाकूयात बॉलिवूड अभिनेत्रींच्या काही अनोख्या फॅशन लूक्सवर.

Lakme Fashion Week 2024
Oscar 2024 : एम्मा ते मार्गोटच्या रेड कार्पेट लूकची चर्चा! कॅमेऱ्यांचा क्लिकक्लिकाट अन् चाहत्यांच्या प्रतिक्रियांना उधाण

सारा अली खान

लॅक्मे फॅशन वीकमध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती अभिनेत्री सारा अली खानच्या लूकची. सारा अली खानने सिल्वर रंगाचा फ्लोरल लेहेंगा परिधान करून रॅम्प वॉक केला. मात्र, हा रॅम्प वॉक करताना साराच्या पोटावर जळाल्याचे व्रण उमटल्याची खूण होती. मागील काही दिवसांपूर्वीच तिला शूटिंग करताना ही दुखापत झाली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

मात्र, साराने या फॅशन वीकला या  सिल्वर लेहेंग्यात तिची ही दुखापत लपवली नाही, तिने न लाजता आणि न डगमगता हा रॅम्प वॉक पूर्ण केला. यासाठी साराचे कौतुक होत आहे. या लेहेंग्यातील तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. साराचा हा लेहेंगा प्रसिद्ध डिझायनर वरुण चक्किलम यांनी डिझाईन केला होता.

श्रृती हासन

लॅक्मे फॅशन वीकमध्ये अभिनेत्री श्रृती हासनने पेस्टल शेडमधील निळ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्यावर श्रृतीने मोकळ्या केसांची हेअरस्टाईल आणि सुंदर मेकअप केला होता.

यासोबतच पायांमध्ये हाय हिल्स परिधान करून तिने तिचा हा लूक पूर्ण केला होता. श्रृतीचा हा लेहेंगा आणि एकूणच लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

मलायका अरोरा

आपल्या फिटनेससाठी आणि अनोख्या फॅशन सेन्साठी ओळखल्या जाणाऱ्या मलायका अरोराने ही लॅक्मे फॅशन वीकमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने हिरव्या रंगाचा सुंदर फ्लोरल लेहेंगा परिधान केला होता.

या हिरव्या लेहेंग्यावर पिवळ्या रंगाची नाजूक फुले होती. तिच्या लूकबद्दल बोलायचे झाल्यास मलायकाने मिनिमल मेकअप आणि मोकळ्या केसांची हेअरस्टाईल कॅरी केली होती. तिचा हा लूक चाहत्यांना कमालीचा आवडला आहे.

तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.मलायकाच्या प्रत्येक फॅशन लूकची नेहमीच चर्चा होताना पहायला मिळते, तिच्या या लूकची देखील तितकीच चर्चा होताना दिसतेय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com