शूटिंगला जाताना बरेचदा सीप्झ फ्लायओव्हरच्या सिग्नलला मी थांबायचे. सिग्नल १८० सेकंदांचा असल्यामुळे इकडेतिकडे बघणंही व्हायचं. माझी तिथं पोहचायची वेळही बरोबर सव्वाआठ. मुंबईतली, त्यातही सीप्झमधली ती गडबड, ट्रॅफिक. .त्यात भुयारी मेट्रोच्या कामाची नुकतीच सुरुवात झालेली. त्यानं रस्ता आणखी छोटा झाला होता. त्यामुळे सगळेच खूपच वैतागलेले असायचे त्या सिग्नलला. माझं लक्ष नेहमी त्या फ्लायओव्हरखाली असलेल्या ‘सौसारांकडे’ जायचं. बरीच कुटुंबं राहायची त्या खाली. प्रत्येकानं आपल्या घराची बॉर्डर ठरवलेली. त्यातलं एक कुटुंब माझ्या खास लक्षात राहिलं..साधारण तिशीतली आई असेल.. आणि बाप साधारण पस्तिशीतला. एक मुलगा आठ-दहा वर्षांचा आणि धाकटी मुलगी साधारण साडेतीन-चार वर्षांची. कुरळ्या सोनेरी केसांची. एक छोटं कुत्र्याचं पिल्लू बारीक सुतळीनं बाजूला बांधलेलं असायचं. .मी तिथं पोचायच्या वेळेला त्यांचा नाश्ता सुरू असायचा. दोन विटांच्या चुलीवर काहीतरी उकळत असायचं आणि बाजूला फुलके सुरू असायचे. नवरा एका बाजूला सायकलवर फुगे, बॉल, पिपाण्या अडकवत असायचा. छोटासा दादा आपल्या धाकट्या बहिणीला उरापोटावर उचलून फिरवत असायचा. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान, प्रसन्न भाव असायचे. ना हक्काचं छप्पर, ना भविष्याची काही चिंता! त्यांना बघून मला अनेकदा टेन्शन यायचं; पण ते कुटुंब मात्र नेहमी हसतमुख असायचं..त्याही दिवशी मी सव्वाआठला तिथे पोहोचले. त्यांचा नाश्ता सुरू होता. वरण आणि पोळी खात होते. आनंदानं बाप आपल्या मुलांना भरवत होता. कुत्र्याचं पिल्लूही मधेच येऊन एखादा तुकडा खात होतं. ते सगळं बघत असताना मी एका वेगळ्याच जगात निघून गेले... आनंदाच्या जगात. असं वाटलं यांच्याकडे काही नसून हे इतके आनंदी जगतात.. मग आपण का आणि कसल्या तक्रारी करतो सतत? सिग्नल लागला, ट्रॅफिक आहे म्हणून मी जी चिडले होते ती त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांना बघून शांत झाले. .त्यांचं स्वतःचं असं काहीही नव्हतं; परंतु एकत्र बसून सकाळचा नाश्ता करण्याची श्रीमंती होती त्यांच्याकडे! येता-जाताना त्यांना बघणं हे अगदी रोजचंच झालं होतं! मनात आलं, काही कपडे लहान मुलांसाठी न्यावे. मी सुट्टीच्या दिवशी दोघांसाठी कपड्यांचे चार-चार जोड घेतले, खाऊ घेतला, ब्लॅंकेट घेतली. ते तिथे राहतात हे चुकीचं आहे, काय गरज आहे इत्यादी गोष्टी नाही मनात आल्या! पण त्यांचं जे आहे त्यात सुखी समाधानी जगणं भावलं होतं मनाला. आपल्याबरोबर कुत्र्याच्या पिल्लाचाही सांभाळ ते करत होते!.Solapur Accident: एकाच वळणावर पुन्हा अपघात; माढा-कुर्डुवाडी रस्त्यावर पिकअप उलटला.दुसऱ्या दिवशी मी त्याच वेळेला त्या सिग्नलला पोहोचले... गाडी बाजूला लावली आणि बघताक्षणी थबकले... तिथं कोणीच नव्हतं... फ्लायओव्हरखालचे सगळे संसार तिथून हटवण्यात आले होते... फक्त लोखंडी बॅरीकेड होती... त्यावर लिहिलं होतं... ‘मुंबई इज अपग्रेडिंग’! प्रवास करताना नकळतपणे मी त्या कुटुंबाशी जोडले गेले होते. तिथली जागा पूर्ण साफ बघून मनाला हुरहूर लागली... हातातल्या पिशव्या पुन्हा गाडीत टाकल्या आणि मनात विचार आला.. कदाचित त्यांचं ‘घर’ही अपग्रेड झालं असेल!.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.