esakal | घरच्या घरी तयार करा मक्याच्या पीठाचा फेसपॅक; सौंदर्यात पडेल भर
sakal

बोलून बातमी शोधा

घरच्या घरी तयार करा मक्याच्या पीठाचा फेसपॅक; सौंदर्यात पडेल भर

घरच्या घरी तयार करा मक्याच्या पीठाचा फेसपॅक; सौंदर्यात पडेल भर

sakal_logo
By
शर्वरी जोशी

'सरसो का साग और मक्के की रोटी एक बार जरुर खानी चाहिए!', असं आपण अनेकदा पंजाबी किंवा हरयाणवी लोकांकडून ऐकलं असेल. साधारणपणे हिवाळ्यात आवर्जुन खाल्ली जाणारी ही डिश कोणत्याही पंजाबी ढाब्यावर तुम्हाला सहज मिळेल. खरंतर मक्याच्या पीठापासून रोटी तयार होते हे इतकंच आपल्याला माहित आहे. परंतु, या पीठापासून अनेक पदार्थ करता येतात हे फार कमी जणांना ठावूक आहे. त्यामध्येच मक्याच्या पीठाचा वापर करुन फेसपॅक करता येतो हेदेखील अनेकांना माहित नसेल. विशेष म्हणजे हा फेसपॅक करणं अत्यंत सोपं असून त्यामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत मिळते. म्हणूनच, मक्याच्या पीठाचा फेसपॅक कसा करावा ते पाहुयात. (lifestyle-Cornmeal-face-pack-on-the-skin-in-the-all-season)

साहित्य -

मक्याचं पीठ - १ चमचा

कच्च दूध - ३ चमचे

मध - १ चमचा

हेही वाचा: केस धुतल्यावर सतत डोकं खाजतंय? घ्या 'ही' काळजी

कृती -

सगळ्यात प्रथम मक्याचं पीठ, दूध आणि मध नीट मिक्स करुन त्याची पेस्ट तयार करुन घ्या. तयार झालेली ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. त्यानंतर ही पेस्ट पूर्णपणे वाळू द्या. चेहऱ्यावर लावलेली पेस्ट वाळल्यानंतर त्यावर पुन्हा पेस्टचा नवा कोट लावा आणि पुन्हा हा लेप वाळू द्या. पेस्टचा दुसरा कोट वाळल्यानंतर गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

loading image