esakal | WFH मुळे हृदयरोगाचा धोका अधिक? पाहा एक्स्पर्ट काय सांगतात..
sakal

बोलून बातमी शोधा

work from home

WFH मुळे हृदयरोगाचा धोका अधिक? पाहा एक्स्पर्ट काय सांगतात...

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोना काळात अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम ( work from home) करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे जवळपास दीड वर्षांपासून अनेक जण घरुनच काम करत आहेत. या काळात दररोजच्या प्रवासाची दगदग जरी कमी झाली असली तरीदेखील अनेक शारीरिक व्याधींनी डोकं वर काढलं आहे. सध्या अनेक जण पाठदुखी, मानदुखी कंबरदुखीने त्रस्त आहेत. सोबतच अनेक जणांना नैराश्य, एकलकोंडेपणाच्या समस्यादेखील जाणवत आहेत. यामध्येच आता कामाचे तास वाढत असल्यामुळे हृयरोग आणि स्ट्रोक होण्याची शक्यता अधिक असल्याचं मत हेल्थ एक्स्पर्टने व्यक्त केलं आहे. (lifestyle-health-tips-to-stay-healthy-while-doing-work-from-home)

हेही वाचा: कोरोनामुळे नोकरी गमावलेल्या शिक्षिकेवर आली कचरा उचलण्याची वेळ

घरुन काम करत असल्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढविले आहेत. तसंच अनेकदा काम करण्याच्या नादात आपल्याला वेळेचंही भान राहत नाही. मात्र, या अतिताणामुळे हृदयरोगाचा धोका अधिक असल्याचं म्हटलं जात आहे. सोबतच अनेक जण दररोज वर्कआऊट करत नसल्यामुळे त्यांचं वजन वाढत आहे. या वाढत्या वजनाचा ताणदेखील हृदयावर येऊ शकतो. इतकंच नाही तर अनेक जणांना धुम्रपान करण्याची सवय असते. त्यामुळेही हृदयाशी निगडीत समस्या उद्धभवू शकतात. म्हणूनच, वर्क फ्रॉम होम करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आपल्या लाईफस्टाईलमध्ये कोणता बदल केला पाहिजे हे हेल्थ एक्स्पर्टने सांगितला आहे.

लाईफस्टाईलमध्ये करा 'हा' बदल

१. मीठाचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ टाळा. जेवतांनादेखील वरुन मीठ घेऊ नका.

२. मैदापासून तयार केलेले पदार्थ खाऊ नका. तसंच जंकफूड कटाक्षाने टाळा.

३. धुम्रपान बंद करु टाका. हे व्यसन सोडवणं सहज शक्य नसलं तरीदेखील हळूहळू त्याचं प्रमाण कमी करा.

हेही वाचा: ऑफिस कलिगवर क्रश आहे?; तर 'ही' खबरदारी नक्की घ्या

४. सकाळी उठल्या उठल्या लगेच ऑफिसचं काम करायला बसू नका. त्यामुळे दिवसभर कामाचा कंटाळा येऊ शकतो. त्याऐवजी सकाळी लवकर उठा आणि थोडा वेळ व्यायाम करा. त्यानंतर काम करायला बसा.

५. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य जपण्याचीही तितकीच आवश्यकता आहे. त्यामुळे दिवसातून एकदा तरी ध्यान करा.

६. दिवसभर तुम्ही लॅपटॉप, कॉम्प्युटर यांच्या समोर असता. त्यामुळे ऑफिसचं काम झाल्यानंतर पुन्हा मोबाईल, व्हिडीओ गेम यांच्यात वेळ घालवू नका. त्याऐवजी कुटुंबासोबत गप्पा मारा.

loading image