का रे दुरावा? कसं टिकवावं लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिप? जाणून घ्या फायदे-तोटे | Long Distance Relationship Tips | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

का रे दुरावा? लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपचे फायदे-तोटे, जाणून घ्या

का रे दुरावा? लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपचे फायदे-तोटे, जाणून घ्या

Long Distance Relationship : लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशीप आज काल खूप साधारण गोष्ट आहे. काम, नोकरी (Job)किंवा इतर काही कारणामुळे रिलेशनशिपमध्ये (Relationship Tips) असलेले जोडपे एकमेकांपासून दूर असतात. जोडपी (Couple) वेगवेगळ्या शहरांमध्ये राज्य किंवा देशांमध्ये असू शकतात जिथे ते रोज एकमेकांना प्रत्यक्षात भेटू शकत नाही. असे म्हणतात की, नात्यात आलेला दुरावा हे प्रेमाची अग्निपरिक्षा असते. हा तो काळ असतो जेव्हा आपण रोज भेटून आपल्या जोडीदारासाठी प्रेम व्यक्त करू शकत नाही. अशामध्ये लोक लॉन्ग डेस्टेंस रिलेशनशीप टिकवू शकत नाही.(Long Distance Relationship Tips In Hindi Advantages And Disadvantages)

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपचे((Long Distance Relationship) खूप साईड इफेक्ट किंवा तोटे असतात पण जर हे नातं व्यवस्थित सांभाळले तर त्याचे काही फायदे असतात ज्यामुळे तुमच्यातील प्रेम वाढते.

चला जाणून घेऊ या, लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपच्या फायदे आणि नुकसानबाबत, जेणेकरून तुम्हाला हे नाते टिकवणे सोपे होईल.

हेही वाचा: Relationship Tips : तुमचा जोडीदार तुम्हाला फसवतोय का, कसे ओळखाल?

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपचे फायदे

 • अशा नात्यामध्ये राहण्याचा फायदा असतो की, जोडप्यांची सहनशक्ती वाढते.

 • जोडप्यांना नात्याची किंमत कळू लागते. दिर्घकाळ एकमेकांपासून लांब राहिल्यास नात्यामध्ये एकमेकांना भेटण्याची वाट पाहतात. अशा वेळी एक दुसऱ्यांचा सन्मान करतात.

 • जेव्हा जोडपे जवळ असतात तेव्हा त्यांच्या नात्यामध्ये जवळीक असते तेव्हा कुठे ना कुठे त्यांच्या नात्यामध्ये उत्सुकता कमी होते. पण तेच जर जोडपे एकमेकांपासून लांब असते तेव्हा त्यांना एकमेकांनी भेटायची ओढ, उत्सुकता वाढते.

 • अशावेळी लॉन्ग डिस्टेंस रिसेशनशीपमध्ये दोघांना एकमेकांच्या वेळचे महत्त्व समजते. तेच एकमेकांसोबत घालविलेला प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी अनमोल असतो.

हेही वाचा: पार्टनरपासून पर्सनल चॅट कसं लपवाल? या ट्रिक्स माहिती हव्यात

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपमुळे होणारे तोटे

 • जे लोक लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपमध्ये असतात ते रोज आपल्या पार्टनरला भेटू शकतना नाही. नात्यामध्ये असूनही एकटे असल्याची भावना मनामध्ये येते.

 • जे लोक लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपमध्ये असतात ते एकमेकांना भेटू शकत नाही आणि त्यांच्यमधील संवादासाठी एकमात्र साधण असते फोन. अशामध्ये तुम्हाला सतत फोन चेक करत राहावे लागते.

 • - दिर्घकाळ एकमेकांपासून लांब असल्यामुळे तुम्हाला आपल्या जोडीदाराच्या दैनदिन गोष्टी समजत नाही. जेवढा वेळ तुम्ही एकत्र असाल तेव्हा जे काही बोलणे होईल तेवढंच तुम्हाला माहित होते. अशावेळी कित्येकदा गैरसमनज होण्याची शक्यता खूप असते.

 • - एकेमकांना न भेटण्यामुळे एकमेकांसाचा वाढदिवस, सण किंवा खास क्षणांच्यवेळी भेटू शकत नाही. इतर जोडप्यासारखे फिरू शकत नही. त्यामुळे एकटेपणा वाढू शकतो.

हेही वाचा: अनोळखी मुलीसोबत मैत्री करताना भीती वाटते? जाणून घ्या, सोप्या टिप्स

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशीप टिकविण्याचे टिप्स

 • अशा नात्यांमध्ये गैरसमज होऊ नये यासाठी जोडप्यांनी एकमेकांना कधीही खोटं बोलू नये.

 • लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशीप टिकविण्यासाठी जोडप्यांना एकमेंकावर विश्वार ठेवायला हवा. त्यामुळे कोणतीही गोष्ट तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत स्पष्ट बोलू शकता.

 • जोडप्यांना एकमेकांवर आरोप लावणे टाळले पाहिजे. पार्टनर फसवू शकतो या शंकेवरून आपलं नाते खराब करू नये.

 • जर काही कारणामुळे तुमचा पार्टनर तुम्हासा ठरलेल्या वेळी मेसेज किंवा कॉल करू शकला नाही तर नाराज होऊ नका त्याऐवजी त्याला समजून घ्या.

 • लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशीप टिकविण्यासाठी एकमेकांसोबत प्रमाणिक असते गरजेचे आहे.

 • तुमच्यातील दुराव्यामुळे नाते खराब करू नका.

 • एकमेकांसोबत बोलत राहा

 • एकमेकांना स्पेस आणि प्रायवसी द्या.

 • वाद-भांडण झाल्यास खूप वेळ धरून ठेवू नका. एकमेकांशी बोलून वाद मिटवा

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top