Lunar Eclipse 2023: अनेक वर्षांनंतर आज सायंकाळी बंद राहणार महालक्ष्मी मंदीर, का ते वाचा

ग्रहण काळ सुरू असे पर्यंत शहरातील सगळीच मंदिरे राहणार बंद
Lunar Eclipse 2023
Lunar Eclipse 2023esakal

Lunar Eclipse 2023: नुकतेच नवरात्रीचा उत्सव आपण साजरा केला. नवरात्रीत नऊ दिवस दुर्गा देवीचा जागर केला. उत्साहात दसऱ्याला रावणाचे दहन केलं. आणि आता कोजागिरी साजरी होणार आहे.

कोजागिरीलाही माता लक्ष्मीचा जागर केला जातो. कोजागिरी पौर्णिमेला दैवी महात्म्यात महत्वाचे स्थान आहे. अशातच देशातील एक माता महालक्ष्मीचे मंदिर आज बंद असणार आहे. याचे कारण काय ते जाणून घेऊयात.

मध्यप्रदेशमधील इंदौर शहरात असलेल्या राजवाडा चौकात १९१ वर्ष जुने महालक्ष्मी मंदिर आहे. या कोजागिरी पौर्णिमेला महालक्ष्मी देवीच्या दर्शनाच्या दिवशी प्रथमच संध्याकाळचे दर्शन होणार नाही. कारण, शरद पौर्णिमेला शनिवारी खंडग्रास असल्याने शहरातील इतर मंदिरांमध्ये सायंकाळची आरती व पूजा होणार नाही. (Lunar Eclipse 2023)

Lunar Eclipse 2023
Kojagiri Purnima 2023 : कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीचं असणार चंद्रग्रहण; ग्रहणकाळात ‘या’ गोष्टी करणे टाळा
आई महालक्ष्मीची आकर्षक मूर्ती
आई महालक्ष्मीची आकर्षक मूर्तीesakal

ग्रहणाच्या नऊ तास अगोदर असलेल्या सुतकमुळे काही ठिकाणी सायंकाळी ४.०५ वाजल्यापासून मंदिराचे दरवाजे बंद केले जातील तर काही ठिकाणी पडदे लावण्यात येतील. यानंतर 29 ऑक्टोबरपासून मंदिरांमध्ये पुन्हा दर्शन आणि पूजा सुरू होणार आहे.

पुजारी भानुप्रकाश दुबे यांनी सांगतले की, कोजागिरी पौर्णिमा ही देवी महालक्ष्मीचा प्रकट दिन आहे. या दिवशी कोजागिरी उपवासही केला जातो. ग्रहण सुरू होईपर्यंत भाविकांना दर्शन आणि पूजा करता येणार आहे. ग्रहण सुरू झाल्यानंतर मंदिर बंद होईल. ग्रहण काळ संपेपर्यंत मंदिराचे दरवाजे बंद केले जातील.

पुजारी अशोक भट्ट यांनी सांगितले की, ग्रहण काळात भाविकांना खजराना गणेशाची पूजा करता येणार नाही. या काळात प्रसाद वाटला जाणार नाही. संध्याकाळची महाआरतीही होणार नाही. गर्भगृहात पडदा लावण्यात येणार आहे.

Lunar Eclipse 2023
Kojagiri Purnima 2023 : कधी आहे कोजागिरी पौर्णिमा? जाणून घ्या मुहूर्त आणि तिथी
इंदौरमधील महालक्ष्मी मंदिर
इंदौरमधील महालक्ष्मी मंदिरesakal

भाविकांना सभामंडपात बसून मूर्तीसमोर नामस्मरण करता येईल. रणजित हनुमान मंदिराचे पुजारी पंडित दीपेश व्यास यांनी सांगितले की, सुतक काळात रणजित हनुमान मंदिराचे दरवाजेही बंद राहणार आहेत.

29 ऑक्टोबर रोजी ब्रह्म मुहूर्तावर मंदिराच्या शुद्धीकरणानंतर पुन्हा दर्शनाला सुरुवात होणार आहे.वर्षातील शेवटचे ग्रहण एक तास 17 मिनिटे चालणार आहे.

Lunar Eclipse 2023
Panchang: कोजागिरी पौर्णिमेला केशरी वस्त्र परिधान करा; दिवस शुभ जाणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com