
यंदाचे पहिले आणि शेवटचे चंद्रग्रहण कधी आणि भारतातून दिसणार आहे का?
वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण 7 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9:57 ते 12:23 पर्यंत भारतात दिसेल.
7 सप्टेंबरच्या चंद्रग्रहणाचा सुतक काळ 9 तास आधी, म्हणजेच दुपारी 12:57 पासून सुरू होईल.
First lunar eclipse 2025 date and visibility in India: या वर्षातील पहिले आणि शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे आणि ते भारतातही दिसेल. शास्त्रांनुसार राहू आणि केतूच्या प्रभावामुळे सूर्य आणि चंद्रग्रहण होतात. या खगोलीय घटनेला आध्यात्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. असं मानलं जातं की ग्रहणाच्या वेळी धार्मिक कार्य केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते. शास्त्रांमध्ये ग्रहणाच्या वेळी घडणाऱ्या घटना आणि त्याच्या धार्मिक गोष्टींबद्दल वर्णन केले आहे. यंदाच्या पहिल्या आणि शेवटच्या चंद्रग्रहणाची सविस्तर माहिती घेऊया, ते भारतात कुठे दिसेल, त्याचा वेळ आणि सुतक कालावधी काय असेल.