Mahashivratri 2023: ‘मेरे शंकरा, बम बम भोले’; शिवभक्ती मनातच नाही तर कपड्यातही उठून दिसेल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahashivratri 2023: ‘मेरे शंकरा, बम बम भोले’; शिवभक्ती मनातच नाही तर कपड्यातही उठून दिसेल!

Mahashivratri 2023: ‘मेरे शंकरा, बम बम भोले’; शिवभक्ती मनातच नाही तर कपड्यातही उठून दिसेल!

उद्या महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीला महादेवांसारखा लुक अनेक तरूण करतात. त्यांच्यासारखी दाढी, केशरचना, हातात जपमाळ घालून शिवभक्ती जागृत केली जाते. काही लोक तर कपाळाला नेहमी भस्म लावतात.अशा नेहमीच महादेवांची भक्ती करणाऱ्यांसाठी महाशिवरात्री म्हणजे मोठा उत्साहाचा दिवस.

महाशिवरात्री दिवशी महिला पांढऱ्या रंगाची साडी घालतात. पण, पुरूषांना पांढरा शर्ट घालणे शक्य होईलच असे नाही. बरं पांढरा कुर्ता घातला तरी त्या लुकमध्ये तूम्ही ऑफिसला जाऊ शकत नाही. त्यामुळे कॅज्युअल लुकसाठीचे काही भन्नाट पर्याय आज आम्ही तूमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

शिव शंकरांची भक्ती दाखवणारे काही टि-शर्ट बाजारात सध्या उपलब्ध आहेत. शर्टवर टि-शर्टवर हर हर महादेव, भोलेनाथ, जय हो जय हो शंकरा, असे टिकर लिहीलेले आहेत.  

हर हर महादेव शर्ट

हर हर महादेव शर्ट

भगवान शंकरांचे वाहन असलेले नंदी महाराज, महादेवांचे त्रिशूळ, केसातींल चंद्र यांचे चित्र असलेले शर्टही तरूणांच्या पसंतीस उतरत आहेत.

महादेवांचे चिन्ह असलेले शर्ट

महादेवांचे चिन्ह असलेले शर्ट

तूम्हाला काहीतरी हटके घालायचे असेल तर भगवान शंकरांचे फोटो प्रिंट केलेले शर्ट तूम्ही नक्कीच घेऊ शकता.

महादेवांचे फोटो शर्ट

महादेवांचे फोटो शर्ट