Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीनिमित्त घरच्या घरी बनवा बदाम थंडाई, एकदम सोपी आहे रेसिपी

Mahashivratri 2024 : यंदा ८ मार्चला महाशिवरात्री सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या दिवशी असंख्य भाविक महाशिवरात्रीचे व्रत करतात.
Mahashivratri 2024
Mahashivratri 2024esakal

Mahashivratri 2024 : अवघ्या काही दिवसांवर महाशिवरात्री येऊन ठेपली आहे. यंदा ८ मार्चला महाशिवरात्री सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शंभू महादेव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे, या दिवसाला खास असे महत्व आहे.

महाशिवरात्रीनिमित्त असंख्य भाविक व्रत करतात. महादेव आणि पार्वतीची विधीवत पूजा करतात. या दिवशी अनेक जण उपवास करतात. उपवास करणारे लोक या दिवशी फळांचे सेवन करतात आणि थंडाई पिऊन उपवास सोडतात.

महादेवाला थंडाई अतिशय प्रिय आहे. त्यामुळे, अनेक जण महाशिवरात्रीला थंडाई पिऊन उपवास सोडतात. आज आम्ही खास तुमच्यासाठी बदाम थंडाईची रेसिपी घेऊन आलो आहोत. पोषकतत्वांनी परिपूर्ण असलेली ही बदाम थंडाई बनवायला अतिशय सोपी आहे. चला तर मग जाणून घेऊयात ही रेसिपी.

Mahashivratri 2024
Healthy Breakfast Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हिरव्या हरभऱ्याचे स्पेशल चाट, एकदम सोपी आहे रेसिपी

बदाम थंडाई बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • १ लीटर दूध

  • १ चमचा खसखस

  • बदाम १५-२०

  • विलायची

  • साखर ३ चमचे

  • बडीशेप १ चमचा

अशा पद्धतीने बनवा बदाम थंडाई

  • बदाम थंडाई बनवण्यापूर्वी २-३ तास आधी एका वाटीत बदाम भिजत घाला.

  • त्यानंतर, हे भिजवलेले बदाम सोलून त्याची मिक्सरला बारीक पेस्ट तयार करा.

  • आता दुसऱ्या बाजूला एका पातेल्यात दूध घालून ते चांगले उकळून घ्या.

  • आता या दुधामध्ये चवीनुसार साखर घालून साधारणपणे ५ मिनिटे शिजू द्या.

  • आता या दुधामध्ये बदामाची बारीक केलेली पेस्ट मिसळा आणि हे मिश्रण चांगले शिजू द्या.

  • या मिश्रणात गुठळ्या राहणार नाहीत, याची काळजी घ्या.

  • आता या मिश्रणात बारीक केलेली विलायची मिसळा. त्यानंतर, पुन्हा हे मिश्रण १५-२० मिनिटांसाठी चांगले शिजू द्या.

  • त्यानंतर, गॅस बंद करा आणि हे दुधाचे मिश्रण थंड व्हायला ठेवा.

  • तुम्ही फ्रीजमध्ये देखील हे मिश्रण थंड व्हायला ठेवू शकता.

  • आता तुमची थंड आणि चवदार बदाम थंडाई एकदम तयार आहे.

  • या थंडाईवर बारीक चिरलेले बदाम आणि पिस्ता घालून सजवा आणि थंडाई सर्व्ह करा.

Mahashivratri 2024
Healhy Breakfast Recipie : सकाळच्या नाश्त्यामध्ये ट्राय करा, ‘हे’ हेल्दी आणि टेस्टी सॅंडवीच, दिवसभर राहील एनर्जी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com