
Mahindra EV Marathi News: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीनं आपल्या दोन नव्या दमदार एसयूव्ही ईव्ही अर्थात ईलेक्ट्रिक एसयूव्ही कार्स भारतात लॉन्च केल्या आहेत. BE 6e आणि XEV 9e अशा या दोन कार असून यांपैकी BE 6e कारच्या टेस्ट राईडचा व्हिडिओ कंपनीनं शेअर केला आहे. यामधील कारचा स्पीड पाहून कदाचित तुमचे डोळे विस्फारतील.