esakal | Coronavirus : घरकामासाठी माणसं घरी येतायेत? मग 'या' गोष्टींची घ्या काळजी

बोलून बातमी शोधा

Coronavirus : घरकामासाठी माणसं घरी येतायेत?  मग 'या' गोष्टींची घ्या काळजी
Coronavirus : घरकामासाठी माणसं घरी येतायेत? मग 'या' गोष्टींची घ्या काळजी
sakal_logo
By
टीम ई सकाळ

देशात कोरोना विषाणूचा होत असलेला उद्रेक पाहून अनेक राज्यांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. या काळात कोणत्याही व्यक्तीस घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसंच अत्यावश्यक काम असल्यास किंवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच केवळ घरातून बाहेर पडण्याची मुभा आहे. त्यातच घरकाम करणाऱ्या स्त्री किंवा हातावर पोट असणारे मजूर यांना सकाळच्या वेळात कामावर जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक जणांचे संसार सध्या सुरु आहेत. मात्र, जर तुमच्या घरीदेखील काम करायला स्त्री येत असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

१. घरात कामाला बाई ठेवण्यापूर्वी ती राहत असलेल्या परिसरात कोणता कोरोना रुग्ण नाही ना याची खात्री करुन घ्या.

२. मेड घरात आल्यानंतर तिला स्वच्छ हातपाय धुवायला सांगा. यासाठी मुख्य दरवाजावरच पाणी आणि हॅण्डवॉशची सोय करा.

हेही वाचा: पेन किलर घेऊ नका! सध्याच्या काळात ठरु शकतं घातक

३. सॅनिटाइझरचा वापर करण्यास सांगा.

४. चप्पल घराबाहेरच ठेवायला सांगा. यात केवळ मेडचं नव्हे,तर कोणतेही पाहुणे किंवा घरातील सदस्य आल्यास त्यांनादेखील चप्पल बाहेर काढण्यास सांगा.

५. जर मेड कोरोना नियमांचं पालन करत नसेल तर तिला सक्त ताकीद द्या.

६. तिने मास्क घातलाय की नाही हे कटाक्षाने पाहा.

७. ज्यावेळी एखादी व्यक्ती बाहेरुन येते त्यावेळी घरातील व्यक्तींनाही मास्क घालण्यास सांगा.

८. जर घरात लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांचा बाहेरील लोकांसोबत संपर्क कमी येईल याची काळजी घ्या.

९. बाहेरील व्यक्तीचा घरातील वावर कमी करा. जिथे गरज असेल तिथेच फक्त मेडला काम करण्यास सांगा.