Makar Sankranti 2023 : गोल्ड, इमिटेशन आणि बरंच काही; संक्रांतीला ऑक्साइड ज्वेलरीच लय भारी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Makar Sankranti 2023

Makar Sankranti 2023 : गोल्ड, इमिटेशन आणि बरंच काही; तरी, संक्रांतीला ऑक्साइड ज्वेलरीच लय भारी!

ट्रेंड बदलत राहतात आणि हा ट्रेंडचा एक महत्त्वाचा भाग आहे. आजकाल ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी ट्रेंडमध्ये आहे. हा ट्रेंड लवकर निघून जाईल असे वाटत नाही. गेल्या काही वर्षांपासून, सुंदर ऑक्सिडाइज्ड दागिन्यांची ही क्रेझ वाढत आहे.

स्वस्त आणि टिकाऊ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑक्सिडाईज पॅटर्न मध्ये आपले पारंपारिक महाराष्ट्रीयन दागिने सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. नेहमीपेक्षा हट के लुक देणाऱ्या या ऑक्सिडाईज दागिन्यांची सध्या खूप फॅशन आहे.इतर कोणत्याही ऍक्सेसरीसाठी हे फंकी रिप्लेसमेंट तर आहेच. पण तुमच्या खिशालाही ते परवडणारे आहेत. त्यामूळे मैत्रिणींच्या घोळक्यात काहीतरी हटके करायचे असेल तर ऑक्साइड ज्वेलरीसारखा बेस्ट ऑप्शन नाही.

कसे बनतात ऑक्साइड दागिने

हे दागिने स्टर्लिंग चांदीचे बनवलेले असतात. स्टर्लिंग चांदी म्हणजे चांदी आणि इतर धातूंचे मिश्रण. जसे की तांबे, जर्मेनियम, जस्त, प्लॅटिनम, सिलिकॉन आणि बोरॉन. ही स्टर्लिंग चांदी शुद्ध चांदीपेक्षा मजबूत असते. म्हणून दागिने किंवा इतर वस्तू बनवताना त्याचा वापर केला जातो.

हेही वाचा: Makar Sankranti : मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात?

फॅन्सी कानातले

महिलांमध्ये ऑक्सिडाइडचे कानातले फेमस आहेत. लहान मोठ्या आकारातील झुमके, चांदबली, पिकॉक, एलिफंट अशा बऱ्याच आकारात ते उपलब्ध आहेत. तुम्ही ते साध्या साडी, कुर्ता किंवा अगदी फॅन्सी जीन्सवरही घालू शकता.

हेही वाचा: Makar Sankranti 2023: येत्या संक्रांतीला बिपाशाच्या ब्लॅक साड्यांचं भारी कलेक्शन नक्की ट्राय करा

ट्रेंडी मंगळसूत्र

सोन्या-चांदीचे मंगळसूत्र खूप सामान्य आहे,.पण आजकाल ऑक्सिडाइज्ड मंगळसूत्र ट्रेंडमध्ये आहे. जेव्हा तुम्ही प्रायोगिक आणि वेगळे होण्याच्या मूडमध्ये असता तेव्हा ऑक्सिडाइज्ड मंगळसूत्र परिपूर्ण लूक देतात.

हेही वाचा: Makar Sankranti : पतंग उडवल्यास खावी लागेल जेलची हवा; वाचा काय सांगतो कायदा

कोल्हापूरी साज

हा दागिना सर्वांना खूप आवडतो आणि ऑक्सीडाइज्ड स्वरूपात हा दागिना खूपच फेमस झाला आहे. शॉर्ट, मिडीयम व लॉंग अशा अनेक प्रकारात आपल्याला या ऑक्सिडाईज कोल्हापुरी साज मध्ये बघायला मिळतात.

हेही वाचा: Fashion Tips : हिल्सच कशाला हवी?; या आयडीया तूम्हाला उंच भासवू शकतात!

बोरमाळ

लहान बोराच्या आकाराची माळ म्हणजे बोरमाळ. गोल तसेच लांबट, चौकोनी मण्यांची ही माळ बनवली जाते. पूर्वी यात फक्त एकच पदर असायचा पण आता दोन किंवा तीन पदरी बोरमाळ जास्त प्रमाणात वापरली जाते.

हेही वाचा: Anarkali Suit Fashion : लग्नापासून ते कॅज्यूअल वेअरपर्यंत सर्वांसाठी परफेक्ट असा एकमेव सूट

तन्मणी

तन्मणी हा गळ्यात घालायचा दागिना आहे. लॉंग व शॉर्ट तन्मणी मध्ये सुद्धा ऑक्सिडाईज तन्मणी उपलब्ध आहेत. तन्मणी पेंडेंटच्या अनेक डिझाइन्स आपल्याला पाहायला मिळतात.

हेही वाचा: Mens Bracelets Fashion : मुलींमध्ये सर्वात जास्त चर्चा असलेले मेन्स ब्रेसलेट!

बांगड्या

ऑक्सिडाइज्ड बांगड्या तुमच्या मनगटाला नाजूक आणि मोहक लुक देतात. जर तुम्ही इंडो वेस्टर्न लुकचे चाहते असाल तर या बांगड्या तुमच्या कलेक्शनमध्ये असणे आवश्यक आहे.

नेकलेस सेट

ऑक्सिडाइज्ड नेकलेस सेट इतके मोहक दिसतात की तुम्हाला इतर कोणतीही ऍक्सेसरी घालायची इच्छाच होणार नाही. तुम्ही हा ऑक्सिडाइज्ड नेकलेस सेट कुर्ती किंवा साडीवर घालू शकता.

हेही वाचा: Winter Fashion : हिवाळ्यातही दिसा स्टायलिश; श्रगचे हे बेस्ट ऑप्शन एकदा ट्राय कराच!

पैजण

ऑक्सिडाइज्ड अँकलेट्स पायांना एक सुंदर लुक देतात आणि तुमच्या दिसण्याला वेगळे आकर्षण देतात. नाजूक ऑक्सिडाइज्ड अँकलेट्स कुर्ती आणि जीन्सवरही चांगले दिसतात.

हेही वाचा: New Year Fashion Trend: न्यू इयर मध्ये असायलाच हवं असं चिकनकरी कुर्त्यांचं परफेक्ट कलेक्शन

अंगठी

ऑक्साइड ज्वेलरीमध्ये अंगठीच्या असंख्य व्हरायटी आहेत. कानातल्या झुमक्यांवर मॅच होतील असे डिझाईन्स आहेत. त्यामूळे एक परिपूर्ण लुक मिळतो.