Fashion Tips : हिल्सच कशाला हवी?; या आयडीया तूम्हाला उंच भासवू शकतात!

हिल्समुळे टाच, पाय दुखण्याचा त्रासही होतो. तसेच, तरूणींना पडण्याचीही भिती असते.
Fashion Tips
Fashion Tipsesakal

एक कंप्लिट लुक त्यालाच म्हणता येईल ज्यावर परफेक्ट सॅंडल असतील. कारण, कोणताही लुक केला तरी त्यावर परफेक्ट अशा चपला, हिल्स, सॅंडलही मॅचिंग लागतात. हिल्सबद्दल बोलायचं झालं तर हिल्स उंची कमी असलेल्या मुलींसाठी  वरदानच आहे.

परफेक्ट आउटफिटवर स्टाइल करताना हिल्स कॅरी केल्याने लूक अधिक प्रभावी होतो. मुलींना फुटवेअरमध्येही अनेक पर्याय आहेत. शूज, टाच, मोजरी, बूट इ. पण कमी उंचीच्या मुली अनेकदा उंच दिसण्यासाठी हील्स घालतात. हील्स कमी उंचीच्या तरूणींना उंच दिसण्यास मदत करते.

Fashion Tips
Rekha Virtual Fashion : रेखाचा तो खंग्री लूक पाहून अँग्री बच्चनही म्हणतील, 'चूकच झाली!'

लग्नसोहळा असो वा कोणताही फंक्शन मुलींना इतरांपेक्षा  वेगळे दिसायचे असते. त्यातही कमी उंचीच्या मुलींना उंच दिसायचे असते. त्यासाठी त्या हिल्सचा पर्याय निवडतात. पण, नेहमी हिल्स घालणे काहीजणींना त्रासदायक ठकते.

Fashion Tips
Womens Fashion : आता कॅथलिक लग्नात नवरीची करवलीही चारचौघीत उठून दिसणार!

हिल्समुळे टाच, पाय दुखण्याचा त्रासही होतो. तसेच, तरूणींना पडण्याचीही भिती असते. त्यामूळे हा पर्याय ट्रेंडी असला तरी सर्वचजण याचा विचार करतील असे नाही. पण, तरीही उंच दिसण्यासाठी काही वेगळे आणि सोपे पर्याय आहेत. ते कोणते पाहुयात़

Fashion Tips
Bipasha Basu:'अगं तुला काही अक्कल!' प्रेग्नंसीमध्ये कुणी 'हाय हिल्स' घालतं का?

उंच दिसण्यासाठी तुम्हाला हील्स घालण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या आउटफिटमधूनही उंच दिसू शकता. म्हणूनच कमी उंचीच्या मुली सलवार कमीज स्टाईल करू शकतात.

रंगाकडे लक्ष द्या

उंची कमी आणि वजन जास्त असेल तर तुम्ही काळ्या रंगाचा आउटफिट घालू शकता. गडद निळा, मरून फॅब्रिक असे काळे किंवा गडद रंग निवडून तुम्ही उंच दिसू शकता.यामध्ये तूमचे वजन जास्त उठून दिसत नाही.

Fashion Tips
गरोदरपणात हाय हिल्स घालता? मग हे वाचाच..

फुल स्लीव्हज

उंच दिसण्यासाठी तुमच्या ड्रेसच्या स्लीव्हजही मदत करू शकतात. कमी उंचीच्या मुलींनी लांब बाही, अर्ध बाही असलेले कपडे घालावेत.

Fashion Tips
World Saree Day 2022: नवराई माझी लाडाची गं; नववधूच्या साडीचा बदलता ट्रेंड!

प्रिंट डिझाइन

फॅब्रिकच्या प्रिंटचा देखील तुम्हाला उंच दिसण्यावर खोलवर परिणाम होतो. उंच दिसण्यासाठी, लांब पट्टेदार प्रिंट असलेले पोशाख घाला. सूट घातल्यास प्रिंटेड कुर्ता किंवा शर्टसोबत साधी पँट घालू शकता.

Fashion Tips
Mrunal Panchal : खरी फॅशन आयकॉन तर मृणाल आहे राव; तिचे फॅशन ट्रेंड पाहून पब्लिक फिदा!

कुर्त्यांची उंची

जर तुमची उंची कमी असेल तर कुर्त्याची लांबी गुडघ्यापर्यंतच ठेवा. उंची कमी असलेल्या मुलींवर खूप लहान आणि खूपच मोठे कुर्ते उठून दिसत नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com