

Makar Sankranti 2026:
Sakal
Makar Sankranti 2026: मकर संक्रांती हा सण महाराष्ट्रात मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी एकमेकांना तिळ गुळ देऊन शुभेच्छा देतात. हा सण आपल्याला प्रेम, आपुलकी आणि सकारात्मकतेची शिकवण देतो. नवीन वर्षाती हा पहिला सण आहे. मनातील राग, गैरसमज दूर करून नात्यांमध्ये नव्या गोडव्याची बीजं रोवण्याचा हा उत्तम काळ आहे. याच शुभदिनी आपण आपल्या कुटुंबीयांना, मित्रांना, नातेवाईकांना खास मराठी शुभेच्छा पाठवून त्यांचा दिवस अधिक आनंदी करू शकतो. शब्द थोडेसे असले, तरी त्यामागील भावना खूप मोठ्या असतात. म्हणूनच यंदा मकर संक्रांतीला केवळ तिळ-गुळ देऊनच थांबू नका, तर मनापासून लिहिलेल्या हटके शुभेच्छांद्वारे आपल्या नात्यांमध्ये गोडवा वाढवा.